Hyundai कंपनी एक कार उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन कार्स भारतीय बाजारपेठेत लॉन्च करत असते. Hyundai Motor कंपनीने Auto Expo २०२३ मध्ये Ioniq 5 ही इलेक्ट्रिक कार लॉन्च केली होती. ह्युंदाई मोटर इंडियाने यावर्षी जोरदार सुरुवात केली आहे. यावर्षात ह्युंदाईच्या टॉप ५ कार्स लॉन्च होणे अपेक्षित आहेत. तर त्या कार कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊयात.

New-gen Hyundai Verna

नवीन सिरीजची Verna sedan २१ मार्च २०२३ रोजी भारतात लॉन्च केली जाणार आहे. Verna sedan च्या आतील आणि बाहेरील डिझाईनमध्ये बदल करण्यात येणार आहेत. इंटिरिअरबद्दल बोलायचे झाल्यास आगामी Verna मोठ्या टचस्क्रीन डिस्प्ले आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे कारला अधिक प्रीमियम लुक मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाल्यास नवीन १.५ टर्बो GDi पेट्रोल इंजिन मिळणार आहे. ज्यात ६ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन (6MT) आणि 7-स्पीड ड्युअल क्लच ट्रान्समिशन (7DCT) सह असणार आहे. नवीन Verna मधील नवीन 1.5L टर्बो इंजिन लवकरच Creta मध्ये देखील दिसणार आहे.

IPL 2025 Mega Auction Date, Time and Live Streaming in Marathi
IPL 2025 Mega Auction Schedule: आयपीएल २०२५ चा महालिलाव किती वाजता सुरू होणार? लाईव्ह टेलिकास्ट कुठे पाहता येईल? जाणून घ्या योग्य चॅनेल
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
Astrological predictions 2025 for Uddhav Thackeray in Marathi
Uddhav Thackeray 2025 Astrological Predictions : ‘२०२५ पर्यंत सुवर्णकाळ…’ उद्धव ठाकरेंसाठी ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी; म्हणाले, ‘शिवसेनेचे राज्य…’
Konkan route, trains on the Konkan route,
नव्या वर्षात कोकण मार्गावरील रेल्वेगाडीला एलएचबी डबे जोडणार
BJP Astrological Predictions 2024 Shani Impact on BJP Future in Marathi
BJP Astrological Predictions 2024: शनी भाजपासाठी अडचणींचा, निवडणुकांमध्ये होणार मोठा धमाका; वाचा ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी
pinaka rocket system france
भारताच्या ‘पिनाका’ रॉकेट लाँचर्सची मागणी जगभरात; कारण काय? काय आहेत याची वैशिष्ट्ये?
New hyundai Verena sedan (image credit -Hyundai)

हेही वाचा : ‘इतक्या’ रुपयांमध्ये 2023 Hyundai Verna च्या बुकिंगला सुरुवात, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स

Kona EV facelift(image credit -Hyundai)

Hyundai Kona EV facelift

ह्युंदाई कंपनी यावर्षी भारतामध्ये आपली Kona EV लॉन्च करू शकते. या कारचे मागच्या वर्षी जागतिक स्तरावर लॉन्चिंग झाले आहे. या कारमध्ये नवीन डिझाईन, नवीन फीचर्स देण्यात येऊ शकतात व ही कार आकाराने देखील मोठी असणार आहे. कोना ईव्हीला सध्या ३९.२ kW चा बॅटरी पॅक मिळतो. एकदा चार्ज केळी की ही कार ४५२ किमी धावू शकते असा कंपनीने दावा केला आहे.

Hyundai Creta facelift

Hyundai Motor India ने त्यांची SUV लाइनअप अपडेट केली आहे. Hyundai Motor India ने अनेक बदलांसह क्रेटा बाजारात आणली आहे. यामध्ये ग्राहकांना जुन्या Creta कारपेक्षा अधिक फीचर्स देण्यात आले आहेत.Hyundai Motor India ने RDE (Real Driving Emmison) नियमांचे पालन करण्यासाठी तीन SUV चे इंजिन अपग्रेड केले आहेत. विशेष म्हणजे या वर्षी एप्रिलपासून भारतात RDE नियम लागू केले जाणार आहेत. यासोबतच हे वाहन E20 इंधनासाठी तयार असेल. यात ११३ bhp -litre, ११३ bhp १.५ लिटर पेट्रोल इंजिन दिले जाईल. खरेदीदार त्यांच्या सोयीनुसार इंजिन निवडू शकतात. तथापि, १३८ Bhp १.४-लीटर टर्बो पेट्रोल मोटर बंद करण्यात आली आहे. Hyundai कडून ऑफरवर अनेक ट्रान्समिशन पर्याय आहेत, ज्यात ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स, IVT आणि ६-स्पीड AT यांचा समावेश आहे.

हेही वाचा : दमदार फीचर्स अन् डिझाईनसह Hyundai Creta देशात सादर, मिळेल तगडं मायलेज, किंमत…

Hyundai Stargazer MPV

गेल्या वर्षी ह्युंदाईच्या Stargazer MPV ने जागतिक स्तरावर पदार्पण केले आहे. हे मॉडेल सध्या इंडोनेशियन बाजारामध्ये उपलब्ध आहे. या वर्षांमध्ये ही कार भारतात लॉन्च होणे अपेक्षित आहे. ही कार कंपनीच्या लाईनपमध्ये ह्युंदाई अल्काझरच्या खाली असणार आहे. हे मॉडेल Kia Carens, Maruti Suzuki Ertiga यांच्याशी स्पर्धा करेल. या MPV मध्ये IVT सह ५-स्पीड MT आणि १.५-लीटर इंजिन निवळणार आहे.

Hyundai new micro SUV

ह्युंदाई कंपनी भारतीय बाजारपेठेमध्ये नवीन micro suv लॉन्च करण्याची तयारी करत आहे. हे मॉडेल कंपनीचे सर्वात स्वस्त एसयूव्ही मॉडेल असणार आहे. हे मॉडेल grand i १० या मॉडेलवर आधारित असणार आहे. ह्युंदाईची हे मायक्रो एसयूव्ही मॉडेल ata Punch, Citroen C3 या कार्सची स्पर्धा करेल.