केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी नवी दिल्लीमधील एका कार्यक्रमामध्ये सोमवारी वाहन उद्योग क्षेत्रातील कार्यक्रमामध्ये मोठं विधान केलं. “प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मीच तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे,” अशं गडकरी यांनी जाहीर भाषणामध्ये म्हटलं. वाहन उद्योगासंदर्भातील ‘एसआयएएम’ने सोमवारी आय़ोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये गडकरींनी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या मंत्रालयाने बनवलेल्या चांगल्या रस्त्यांचा सर्वाधिक फायदा हा वाहन उद्योगाला होणार असल्याचंही म्हटलं.

नितीन गडकरींनी सोमवारी सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मेक्रर्सच्या (‘एसआयएएम’) कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी गडकरींनी त्यांच्या मंत्रालयाकडून २७ ग्रीनफिल्ड एक्सप्रेस हायवे बांधले जात असल्याची माहिती दिली. तसेच २६० ठिकाणी रोपवे प्रकल्प उभारण्यासंदर्भातील मागण्या आपल्याकडे आल्याचंही ते म्हणाले.

Guardian Minister Controversy
Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : राष्ट्रीय अध्यक्ष व्हायला सांगितलं तर व्हाल का? मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “पक्ष जे सांगेल…”
Devendra Fadnavis Speech
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने हास्यकल्लोळ, “सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही संध्याकाळी…”
Image of L&T Chairman And Logo
“काहीतरी उल्लेखणीय करण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज”, अध्यक्षांच्या वादग्रस्त विधानावर L&T चे स्पष्टीकरण
Sudhir Mungantiwar and Devendra Fadnavis
Sudhir Mungantiwar : देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळातून वगळलं का? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “मी स्पष्टच सांगतो…”
Eknath Shinde criticized opposition claiming elections sealed Dhanushyaban and Shiv Sena s fate
राज्याबाहेर एक जरी उद्योग गेला तर मी तुमची काळजी घेईन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्योग मंत्र्यांना इशारा
Image Of Gautam Adani And Narendra Modi
Modi-Adani : “मोदींनी प्रत्येक नियम मोडत अदाणींना मोठे केले, पण आता…” अमेरिकेतील खटल्यांवरून माजी केंद्रीय मंत्र्याची टीका

“प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मीच तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे कारण मी रस्ते निर्माण क्षेत्राचं काम पाहत आहे. यामुळे ज्या एका क्षेत्रातील लोकांचा फायदा होणार आहे ते क्षेत्र म्हणजे वाहन उद्योगाचं आहे,” असंही गडकरींनी सांगितलं. “चांगल्या रस्त्यांमुळे वाहनांची मागणी वाढेल,” असंही गडकरींनी म्हटलं. मागील आठ वर्षांमध्ये देशातील वेगवेगवळ्या भागांमध्ये मोठे प्रकल्प यशस्वी करण्याचं काम गडकरींच्या नेतृत्वाखाली झालं आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी हसत हसत आपणच वाहन क्षेत्रासाठी सर्वात महत्त्वाची व्यक्ती असल्याचं म्हटलं.

नक्की वाचा >> नितीन गडकरींना YouTube कडून महिन्याला किती पैसे मिळतात?; स्वत:च म्हणाले होते, “आज मला महिन्याला…”

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री असलेल्या गडकरींनी त्यांच्या मंत्रालयाकडून दिल्ली ते मुंबई, दिल्ली ते देहरादून, दिल्ली ते हरिद्वार, दिल्ली ते कटरा, दिल्ली ते चंडीगढ, चेन्नई ते बंगळुरु यासारख्या प्रकल्पांबरोबरच इतरही अनेक रस्ते बांधले जात असल्याचं सांगितलं.

Story img Loader