जगभरात आता इलेक्ट्रिक वाहनांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्या इलेक्ट्रिक गाड्या निर्मितीच्या क्षेत्रात उतरल्या आहेत. पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांमधून प्रदूषण होत असल्याने अनेक देश इलेक्ट्रिक वाहनांना चालना मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांचा खप वाढेल, यात शंका नाही. मात्र इलेक्ट्रिक वाहन घेतल्यानंतर त्याची देखभाल कशी करायची असा प्रश्न ग्राहकांना पडतो. त्यामुळे काही गोष्टींकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. यामुळे आपलं इलेक्ट्रिक वाहन व्यवस्थित आणि सुरक्षित राहील.

बॅटरी लाइफ
इलेक्ट्रिक वाहनं अर्थातच बॅटरीवर धावतात. त्यामुळे जितकी चांगली बॅटरी तितकी चिंता कमी होणार आहे. तुम्ही नवीन ई वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सर्वप्रथम त्या इलेक्ट्रिक वाहनाच्या बॅटरी लाइफबद्दल सर्व माहिती गोळा करा. कार किंवा बाईकची बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावर किती काळ टिकेल आणि त्या बॅटरीचे आयुष्य किती वर्षे असेल हे तपासून घ्या.

कंपनीची माहिती घ्या
तुम्ही जिथून वाहन खरेदी करण्याचा विचार करत आहात त्या कंपनीबद्दल सखोल संशोधन करा. यामध्ये तुम्ही जाणून घेऊ शकता की कंपनीने विकलेली ई वाहने किती टिकाऊ आहेत आणि त्यांची कामगिरी कशी आहे?

इतर ई वाहनांशी तुलना करा
बाजारात अनेक इलेक्ट्रिक वाहनं निर्मिती करणाऱ्या कंपन्या आहेत. त्यात इलेक्ट्रिक वाहनं सध्या महाग आहेत. त्यामुळे वाहन खरेदी करण्यापूर्वी इतर कंपन्यांबद्दलही जाणून घ्या. इलेक्ट्रिक वाहने घेण्यापूर्वी त्याच्या किंमतीबद्दल माहिती घ्या. याशिवाय त्या वाहनाची इतर ई-वाहनांशी तुलना करा. तुलना केल्यावर जे उत्तम पर्याय तुमच्या समोर येत आहेत, ती वाहने विकत घ्या.

Story img Loader