Bike Safety Tips: भारतामध्ये सर्वाधिक लोक बाईकचालक असून दरवर्षी बाईकची विक्री करोडोंमध्ये नोंदवली जाते. मात्र, बाईकचोरीच्या अनेक घटनाही समोर येतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमची बाईक चोरी होण्यापासून वाचवायची असेल, तर खाली दिलेल्या टिप्स नक्की फॉलो करा..

बाईक सुरक्षित ठेवण्यासाठी टिप्स

हेही वाचा: दुर्गम भागात कार अचानक बंद पडली? ‘या’ सोप्या टिप्स ठरतील फायदेशीर

बाईक टायर लॉक लावा

बाईक लॉक हे चोरीपासून सुरक्षित ठेवण्यास मदत करते. बाजारात अनेक प्रकारची लॉक उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही लॉक बाईकला लावू शकता. हे लॉक बाईकच्या पुढच्या टायरमध्ये बसवले जाते. त्यामुळे बाईकचे चाक जाम होते. कोणी बाईक चोरण्याचा प्रयत्न केला तरी तो बाईक चालवून घेऊन जाऊ शकत नाही.

सेंट्रल लॉक लावा

जर तुम्हाला तुमची बाईक अधिक सुरक्षित बनवायची असेल, तर बाईकमध्ये सेंट्रल लॉक लावल्यानेही बाईकची चोरी होत नाही. हे लॉक शोरूम आणि बाहेरील सामानाच्या दुकानातही सहजपणे स्थापित केले जाऊ शकते. ते बाईकला लावल्यानंतर कोणी बाईकशी छेडछाड केली, तर अलार्म वाजतो. त्यामुळे बाईक चोरणे कठीण झाले आहे.

हेही वाचा: दिवाळीच्या दिवसात फटाक्यांमुळे होऊ शकते तुमच्या गाडीचे नुकसान; सुरक्षेसाठी महत्त्वाच्या टिप्स

लोखंडी साखळी

बाईकला मजबूत गेट, भिंत, खांब, जाड लोखंडी साखळीनेदेखील बांधता येते. त्यामुळे चोरांना तुमची बाईक चोरणे कठीण जाईल.

सुरक्षित पार्किंग निवडा

बाईक नेहमी सुरक्षित आणि योग्य ठिकाणी पार्क करा. तुमची बाईक जास्त लोकवस्तीच्या ठिकाणी पार्क करण्याचा प्रयत्न करा.