भारतात SUV सोबत सात सीटर कारला चांगली मागणी आहे. देशात अधिक आसन क्षमता असलेल्या गाड्या अधिक पसंत केल्या जातात. अनेकजण आपल्या कुटुंबियांच्या विचार करून कार खरेदी करतात. यात मोठं कुटुंब असल्यास अनेक लोक सात सीटर कार खरेदी करण्यास पसंती दर्शवतात. स्वस्त 7-सीटर कार असल्यामुळे मारुतीच्या एर्टिगाला चांगली मागणी असते.
मारुती सुझुकी एर्टिगा आपल्या सेगमेंटमध्ये आघाडीवर आहे. Ertiga गेल्या जुलैमध्ये सर्वाधिक विकली जाणारी ७-सीटर कार आणि MPV आहे. गेल्या महिन्यात, एर्टिगाने केवळ विक्रीत बंपर उडी घेतली नाही तर टॉप-५ सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारमध्येही स्थान मिळवले. एर्टिगाने जुलैमध्ये १४,३५२ युनिट्सची विक्री केली आहे, तर गेल्या वर्षी (२०२२) जुलैमध्ये केवळ ९,६९४ युनिट्सची विक्री झाली होती. त्याची विक्री वार्षिक आधारावर ४८ टक्क्यांनी वाढली आहे.
(हे ही वाचा : मारुतीच्या स्वस्त SUV समोर Nexon ना Creta, सर्व पडल्या फिक्या; झाली धडाक्यात विक्री, खरेदीसाठी लागल्या रांगा)
इनोव्हा आणि केरेन्सला टाकले मागे
मारुती सुझुकी एर्टिगा ही एक एमपीव्ही आहे आणि एमपीव्ही मार्केटमध्ये इनोव्हा आणि केरेन्सला परवडणारा पर्याय आहे. अशा परिस्थितीत विक्रीच्या बाबतीत ते या दोघांपेक्षा पुढे आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये, टोयोटाने इनोव्हा हायक्रॉस आणि क्रिस्टा यांच्या एकूण ८,९३५ युनिट्सची विक्री केली होती, तर गेल्या वर्षी (२०२२) जुलैमध्ये एकूण ६,९०० युनिट्सची विक्री केली होती.
म्हणजेच वार्षिक आधारावर इनोव्हाच्या विक्रीत २९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यापाठोपाठ MPV सेगमेंटमध्ये Kia Carens होते, ज्याने जुलै २०२३ मध्ये ६,००२ युनिट्स आणि गेल्या वर्षी (२०२२) जुलैमध्ये ५,९७८ युनिट्सची विक्री केली होती. याच्या विक्रीत विशेष बदल झालेला नाही.