Mahindra SUV November 2022 Sales Report: भारतातील एसयूव्ही सेगमेंटमध्ये (SUV segment) महिंद्राचे बरेच वर्चस्व आहे. महिंद्रा प्रत्येक गाड्या लोकांच्या पसंतीस उतरत आहेत. महिंद्रा बोलेरो (Mahindra Bolero) ही दमदार एसयुव्ही आहे. या चारचाकीवर सर्वच जण फिदा आहेत. बोलेरो ही कार शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही लोकप्रिय आहे.ओबडधोबड रस्ता असो वा गुळगुळीत महामार्ग, सर्वच रस्त्यावर बोलेरोचं अधिराज्य चालतं. या कारने आता महिंद्राच्याच एक्सयूव्ही ७०० आणि स्कॉर्पिओ एन मागे टाकत ही कंपनीची कार नोव्हेंबर २०२२ मधील सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. कंपनीने गेल्या महिन्यात या कारच्या ७,९८४ युनिट्सची विक्री केली आहे.

Mahindra च्या ‘या’ चार SUV ची सर्वाधिक विक्री

Mahindra Bolero: नोव्हेंबर 2022 मध्ये, महिंद्रा बोलेरोच्या ७,९८४ युनिट्सची विक्री झाली, तर गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२१ मध्ये ५,४४२ युनिट्सची विक्री झाली. म्हणजेच या SUV ने ४७ टक्के वाढ नोंदवली आहे. या SUV ची किंमत ९.५३ लाख रुपयांपासून सुरू होते. हे वाहन गेल्या एक दशकापासून ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहे. यात १.५ लीटर डिझेल इंजिन आहे.

honda and nissan merging plan
बड्या जपानी मोटारकंपनीला घरघर… होंडा-निस्सानने विलिनीकरणचा पर्याय का निवडला?
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Maruti suzuki sold most cars this year than hyundai tata and Mahindra check details
टाटा, महिंद्रा आणि ह्युंदाईची बोलती बंद! यावर्षी एकट्या मारुतीने केली सर्वाधिक कारची विक्री, आकडे पाहून व्हाल थक्क
Toyota revealed Urban Cruiser EV as Sister Model of Suzuki e Vitara
Urban Cruiser EV : टोयोटाची पहिली इलेक्ट्रिक कार! सुझुकी ई विटाराची जणू धाकटी बहीण; पाहा, भारतात कधी होणार लाँच?
Bahiram Yatra, Amaravati, Bahiram Yatra starts,
अमरावती : रोडगे, गूळ भाकर, आलू-वांग्याची भाजी; बहिरमच्या प्रसिद्ध यात्रेची परंपरा व इतिहास…
Chetak Festival, Horse Sarangkheda Chetak Festival,
अबब…सारंगखेडा चेतक फेस्टिव्हलमध्ये १९ कोटींचा घोडा
Dada Bhuses son Aviskar Bhuse attacked by suspected cattle smugglers in two cars
मंत्री दादा भुसे यांच्या मुलाच्या वाहनावर संशयित गोवंश तस्करांचा हल्ला
nmmt bus tracking system technical glitch
नवी मुंबई : ट्रॅकिंग प्रणालीचे आधुनिकीकरण गरजेचे

(आणखी वाचा : उद्योगपतीचा नादच खुळा! भारतातील सर्वात महागडी सुपरकार खरेदी केली, किंमत वाचून तुम्हालाही धक्काच बसेल )

Mahindra Scorpio: हे नोव्हेंबरमध्ये कंपनीचे दुसरे सर्वाधिक विक्री होणारे वाहन ठरले आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये त्याची ६,४५५ युनिट्सची विक्री झाली आहे, तर नोव्हेंबर २०२१ मध्ये गेल्या वर्षी ३,३७० युनिट्सची विक्री झाली आहे. म्हणजेच या SUV ने ९२ टक्के वाढ नोंदवली आहे. हे आता स्कॉर्पिओ-एन आणि स्कॉर्पिओ क्लासिक या दोन मॉडेल्समध्ये येते. या दोन्ही मॉडेल्सची किंमत सुमारे १२ लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.

Mahindra XUV300: ही कंपनीची सब-कॉम्पॅक्ट SUV आहे, ज्याने नोव्हेंबर २०२२ मध्ये ५,९०३ युनिट्स विकल्या. महिंद्राच्या यादीत ते तिसऱ्या क्रमांकावर आहे. या SUV ची किंमत ८.४१ लाख रुपयांपासून सुरू होते.

Mahindra XUV700: हे महिंद्राच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. गेल्या महिन्यात त्याने ५,७०१ युनिट्सची विक्री केली आहे, जी नोव्हेंबर २०२१ मध्ये विकल्या गेलेल्या ३,२०७ युनिटच्या तुलनेत ७७ टक्के वाढ आहे. त्याची किंमत १३.४५ लाख रुपयांपासून सुरू होते.

Mahindra Thar: भारतात महिंद्रा थार ही एक पॉवरफुल ऑफ रोड एसयूव्ही आहे. या कारची बाजारात चांगली विक्री होते. नोव्हेंबर २०२२ मध्ये कंपनीने या कारचे ३,९८७ युनिट्स विकले आहेत.

Story img Loader