350cc Bike Sales: रॉयल एनफील्ड (Royal Enfield) भारतात खूपच पॉप्यूलर बाईक निर्माता ब्रँड आहे. खास करून 350cc सेगमेंट मध्ये या बाईक निर्माता कंपनीचे राज आहे. कंपनीचे रॉयल एनफील्ड क्लासिक 350 आपल्या सेगमेंटची सर्वात पॉप्यूलर बाईक आहे. मागील महिन्यात सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या बाईक्समध्ये 350cc सेगमेंट मधील बाईक्सचा समावेश आहे. तर क्रूझर बाइक्सच्या सेगमेंटमध्ये रॉयल एनफील्ड ३५० ही देशातली सर्वाधिक विकली जाणारी बाईक आहे. या बाईकला देशभरात खूप मागणी आहे. ही बाईक तिचा लूक, स्टाईल, इंजिन आणि मायलेजमुळे भारतीयांची पसंती मिळवत आहे.
350cc बाईकच्या विक्रीत वाढ
भारतीय ऑटो बाजारात मागच्या महिन्यात म्हणजे नोव्हेंबर २०२२ मध्ये 350cc बाईकच्या विक्रीत तब्बल ५४.४७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये टॉप सहा विकल्या गेलेल्या 350cc मॉडेल्सची एकूण विक्री ६४,३९७ युनिट्स होती, जी नोव्हेंबर २०२१ मध्ये विकल्या गेलेल्या ४१,६८८ युनिट्सपेक्षा २२,७०९ युनिट्स जास्त आहे.
(हे ही वाचा : चर्चा तर होणारच! ‘इतक्या’ स्वस्तात मिळताहेत मारुतीच्या ‘ह्या’ जबरदस्त कार; जाणून घ्या कसा होणार फायदा )
‘या’ आहेत सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाईक
Royal Enfield classic 350
नोव्हेंबर २०२२ मध्ये Royal Enfield ची classic 350 ही या सेगमेंटतील आणि कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी बाईक आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये या बाईकच्या २६,७०२ युनिट्सची विक्री झाली आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये विकल्या गेलेल्या १९,६०१ युनिटच्या तुलनेत हे प्रमाण ३६.२३ टक्क्यांनी वाढले आहे.
RE classic
एकूण 350cc बाईकच्या यादीत RE क्लासिक नवव्या स्थानावर आहे. नोव्हेंबरमध्ये १५,५८८ युनिट्ससह हंटर 350 ही या विभागातील दुसरी सर्वाधिक विक्री होणारी बाईक आहे.
(हे ही वाचा : फक्त ७० हजाराचा डाउनपेमेंट करून घरी न्या मारुतीची ‘ही’ जबरदस्त मायलेजवाली कार )
Royal Enfield Bullet 350
Royal Enfield चे लोकप्रिय मॉडेल Bullet 350 या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असून या बाईकने ८,२११ युनिट्सची विक्री केली आहे.
उल्का 350 आणि इलेक्ट्रा 350
या उल्का 350 बाईक्सची ७,६९४ युनिट्स आणि इलेक्ट्रा 350 या बाईकची ४,१७० युनिट्सची विक्री झाली आहे.
होंडा CB 350
होंडाच्या CB 350 ने 350cc विभागात सहावे स्थान मिळवले आहे. या बाईकची नोव्हेंबर २०२२ मध्ये २,०३२ युनिट्सची विक्री झाली.