CNG price hike: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे वाहनांमध्ये सीएनजी वापरण्यावर भर देत आहेत. मात्र त्यांच्याच मूळ गावी नागपुरमध्ये सीएनजीचा (CNG) भाव पेट्रोल आणि डिझेलच्या वर पोहोचला आहे. शहरात सीएनजीचा दर प्रतिकिलो १२० रुपये, तर डिझेलचा दर ९२.५१ रुपये आणि पेट्रोलचा दर १०९.७५ रुपये प्रतिलिटर झाला आहे.
महाराष्ट्रील एका शहारत सर्वाधिक दर
महाराष्ट्रील नागपुरात सीएनजीचा दर देशात सर्वाधिक आहे. एकेकाळी सीएनजी पेट्रोल आणि डिझेलपेक्षा स्वस्त समजले जायचे, पण आता निदान नागपुरात तरी तसे नाही. दरवाढीबरोबरच नागपुरात सीएनजी तुटवडाही निर्माण झाला आहे.
(हे ही वाचा: टू-व्हीलर इन्शुरन्स क्लेम का नाकारला जातो? जाणून घ्या कारण)
कारण काय?
शहरात फक्त रॉमॅट इंडस्ट्रीजच सीएनजी स्टेशन चालवते. आंतरराष्ट्रीय बाजारात एलएनजीच्या किमती वाढल्यामुळे सीएनजीच्या किमतीत वाढ झाल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले.