इलेक्ट्रिक चारचाकी कार खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील आघाडीची कार निर्माता कंपनी टाटा मोटर्सने आपल्या दोन कारच्या किमतीत मोठी कपात केली आहे. कारच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या बॅटरी सेलच्या किमतीत किंचित घट झाल्यामुळे टाटा मोटर्सने कारच्या किमती कमी केल्याची माहिती समोर आली आहे.
इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांच्या क्षेत्रात टाटा मोटर्स आघाडीवर आहे. त्याच्या पोर्टफोलिओमध्ये Tata Nexon EV, Tata Tiago EV, Tata Tigor आणि Tata Punch EV यांचा समावेश आहे. आता यापैकी कंपनीने Nexon EV आणि Tiago EV च्या किमती १ लाख २० हजार रुपयांनी कमी केल्या आहेत.
किमतीत कपात केल्यानंतर, Tata Tiago EV भारतात ७.९९ लाखांपासून सुरू होईल. दरम्यान, Nexon EV ची किंमत १४.४९ लाख रुपयापासून सुरू होते तर लांब-श्रेणी Nexon EV ची किंमत १६.९९ लाख रुपयापासून सुरू होते. याशिवाय, नुकत्याच लाँच झालेल्या Punch.EV च्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
(हे ही वाचा : मारुतीच्या ‘या’ स्वस्त ७ सीटर CNG कारला तुफान मागणी, होतेय धडाक्यात विक्री; 26kmpl पर्यंतचं मायलेज, किंमत… )
किमतीत कपात केल्यानंतर, टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे चीफ कमर्शियल ऑफिसर विवेक श्रीवत्स यांनी एका प्रसिध्दीपत्रकात म्हटले, “बॅटरीचा खर्च हा ईव्हीच्या एकूण खर्चाचा मोठा भाग असतो. अलीकडच्या काळात बॅटरी सेलच्या किमती कमी झाल्यामुळे आणि नजीकच्या भविष्यात त्यांचा संभाव्य तुटवडा, लक्षात घेऊन आम्ही परिणामी फायदे थेट ग्राहकांना देण्याचे निवडले आहे.”, असे त्यांनी नमूद केले.
टाटाच्या Nexon EV आणि Tiago EV या दोन्ही इलेक्ट्रिक कारला भारतीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. टाटाची Tata Nexon EV ही कार मिडियम रेंज आणि लाँग रेंज अशा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. कारच्या MR आवृत्तीमध्ये ३०kWh बॅटरी देण्यात आली आहे. ही कार ३२५ किमीची रेंज आणि १२७bhp ची टॉप पॉवर जनरेट करते.
तर Tata Tiago EV ही दोन बॅटरीपॅक पर्यांयासह उपलब्ध आहे. Tata Tiago EV १९.२kWh आणि २४kWh मध्ये दोन पर्याय उपलब्ध आहेत जे IP६७ रेट केलेले आहेत. २४kWh बॅटरी पॅक पूर्ण चार्ज केल्यावर ३१५ किमीची रेंज देतो. याला स्पोर्ट्स ड्राइव्ह मोड देखील मिळतो, जो ५.७ सेकंदात ० ते ६०Kmph पर्यंत वेग वाढवू देतो. या कारमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन उपलब्ध आहे.