हार्दिक पांड्या हा भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार आहे. तसेच तो भारतीय क्रिकेट संघातील एक अष्टपैलू खेळाडू आहे. आयपीएल या अत्यंत लोकप्रिय असलेल्या स्पर्धेतील गुजरात टायटन्स या संघाचा कर्णधार देखील आहे. अन्य सेलिब्रेटीजना ज्या प्रकारे लक्झरी कार्स वापरण्यास आवडते. त्यांच्याकडे अनेक महागड्या कार्सचे कलेक्शन असते. तसेच भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याकडे देखील असलेल्या कार्सच्या ताफ्यामध्ये अनेक महागड्या कार्सचा समावेश आहे. हार्दिक पांड्याच्या कार कलेक्शनमध्ये कोणकोणत्या महागड्या आणि लक्झरी कार्सचा समावेश आहे हे आज आपण जाणून घेऊयात.

हार्दिक पांड्याचे कार कलेक्शन

Lamborghini Huracan EVO

(Image Credit- lamborghini)

Lamborghini Huracan EVO ही हार्दिक पांड्याकडे असणाऱ्या कर कलेक्शनमधील सगळ्यात महागडी आणि लक्झरी कार आहे. ही कार टू-सीटर या प्रकारातील आहे. याची किंमत ३.२ कोटी (एक्सशोरूम) रुपये इतकी आहे. या कारमध्ये ५.२ लिटरचे V10 इंजिन देण्यात आले आहे. ज्यामुळे या कारच्या चारही चाकांना ताकद मिळते. या कारमधील इंजिन ६३१ बीएचपी पॉवर आणि ६०० एनएम टॉर्क जनरेट करते. ही कार केवळ २.९ सेकंदात व ते १०० किमी पर्यंत स्पीड पकडू शकते असा कंपनीचा दावा आहे. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.

red sanders smuggling
Pushpa Box Office Collection : चंदन तस्करीवर बेतलेल्या ‘पुष्पा’नं कमवले १५०० कोटी; पण खऱ्याखुऱ्या रक्तचंदनाला मात्र ग्राहकच नाही
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
dhotar culture wardha
धोतर वस्त्र प्रसार अभियान; धोतर घाला, संस्कृती पाळा
Solapur tiger latest marathi news
Solapur Tiger News : ५० वर्षांनी सोलापुरात व्याघ्रदर्शन; शेतकऱ्यांमध्ये दहशत
Alibaug, Gorai, Madh , Growth Hub, tourism revenue,
अलिबाग, गोराई, मढचा ‘ग्रोथ हब’अंतर्गत कायापालट; पर्यटनाद्वारे महसूल सहा वर्षांत ६००० कोटी डाॅलरवर नेण्याचे उद्दिष्ट
mhada bolinj loksatta news
वसई : बोळींज म्हाडा घरांच्या स्वस्ताईवर आधीचे खरेदीदार नाराज, फसवणूक केल्याचा आरोप
Maruti suzuki sold most cars this year than hyundai tata and Mahindra check details
टाटा, महिंद्रा आणि ह्युंदाईची बोलती बंद! यावर्षी एकट्या मारुतीने केली सर्वाधिक कारची विक्री, आकडे पाहून व्हाल थक्क
lonar lake flamingos marathi news
Video : ‘फ्लेमिंगो’ला आवडले लोणार सरोवर

हेही वाचा : Hyundai Car Discounts: ह्युंदाईच्या ‘या’ कार्सवर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट, एकदा पाहाच

Mercedes-Amg G 63

(Image Credit-mercedes benz)

हार्दिक पांड्याकडे असलेल्या कर कलेक्शनमधील दुरी कार आहे ती म्हणजे मर्सिडीज AMG G 63. या कारची किंमत देखील २.५ कोटी रुपये इतकी आहे. मर्सिडीज AMG G 63 कार मल्टिपल पॉवरट्रेनसह लॉन्च करण्यात आले आहे. याच्या टॉप फीचर्स असणाऱ्या ग्रँड एडिशनमध्ये ४.० लिटरचे V8 हे इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ५७७ बीएचपी पॉवर आणि ८५० एनएम टॉर्क जनरेट करते.

रेंज Rover Vogue

(Image Credit- landrover)

एसयूव्ही रेंज रोव्हर Vogue ही कार हार्दिक पांड्याच्या कार कलेक्शनमधील तिसऱ्या क्रमांकाची कार आहे. सामान्यतः अधिकतर सेलिब्रेटींजकडे असणाऱ्या कार्समध्ये एक लँड रोव्हरचा समावेश असतो. हार्दिक पांड्याकडे असणाऱ्या Vogue ची किंमत २.३ कोटी रुपये इतकी आहे. यामध्ये अनेक प्रकारचे इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. टॉप मॉडेलमध्ये ४.४ लिटरचे ट्वीन टर्बो V8 इंजिन देण्यात आले आहे जे ५२३ बीएचपी पॉवर आणि ७५० एनएम टॉर्क जनरेट करतात.

हेही वाचा : Petrol-Diesel Price on 14 October: अनेक शहरात पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे! तुमच्या शहरात झाली का घट, येथे पाहा…

Audi A6

(Image Credit-audi)

हार्दिक पांड्याच्या कार कलेक्शनमध्ये Audi A6या सेडानचा देखील समावेश आहे. सध्या भारतात या कारची किंमत ६१ लाख रुपये आहे. ही कार अनेक व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. या कारमध्ये २.० लिटरचे टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन २६१ बीएचपी पॊवर आणि ३७० एनएम टॉर्क जनरेट करते.

Story img Loader