Smriti Mandhana Car Collection: महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या पहिल्या हंगामापूर्वीचा खेळाडू लिलाव सोमवारी (१३ फेब्रुवारी) पार पडला. या लिलावात अपेक्षेप्रमाणे भारताच्या खेळाडू प्रमुख आकर्षण ठरल्या. भारताच्या १० महिला खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागली. भारताची डावखुरी सलामीवीर स्मृती मानधना लिलावातील सर्वांत महागडी खेळाडू ठरली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने सर्वाधिक ३.४० कोटी रुपयांच्या बोलीसह मानधनाला आपल्या संघात समाविष्ट करून घेतले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्मृती मंधानाबद्दलची अशी एक गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे की ती जितकी मोठी क्रिकेटर आहे तितकेच ती कार प्रेमी देखील आहे. स्मृती मंधाना यांच्या कार प्रेमाचा अंदाज यावरून बंधू शकतो की तिच्याकडे कारचे मोठे कलेक्शन आहे.

हेही वाचा : ‘इतक्या’ रुपयांमध्ये 2023 Hyundai Verna च्या बुकिंगला सुरुवात, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स

जर तुम्हाला देखील स्मृती मंधाना क्रिकेटर म्हणून आवडत असेल तर , आज आपण स्मृती मंधानाच्या कारचे कलेक्शन आज घेऊयात. स्मृती मंधानाच्या कार कलेक्शनमध्ये मारुती सुझुकीच्या सेडानपासून रेंज रोव्हर एसयूव्ही या गाड्या समाविष्ट आहेत.

Maruti Dzire

स्मृती मंधानाच्या कार कलेक्शनमधील पहिली कार आहे ती म्हणजे मारुती डिझायर होय. ही कार मंधानाने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला खरेदी केली होती. मारुती डिझायर ही सेडान कार आहे जी कमी किंमत, चांगली केबिन स्पेस आणि मायलेजसाठी पसंत केली जाते. मारुती डिझायरची एक्स-शोरूम किंमत ६.४४ लाख ते ९.३१ लाख रुपये आहे.

Hyundai Creta

Hyundai Creta ही कार स्मृती मंधानाच्या कार कलेक्शनमधील दुसरी कार आहे. ही एक कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार आहे. Hyundai Creta ही तिच्या कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी SUV आहे जिची किंमत १०.६४ लाख ते १८.६८ लाख रुपये इतकी आहे.

हेही वाचा : Yamaha ने लॉन्च केली 2023 Yamaha MT- 15 बाईक, जाणून घ्या किंमत फीचर्स आणि स्पेशिफिकेशन्स

Audi

स्मृती मंधानाकडे ऑडी कार देखील आहे. मात्र त्याचे कोणते मॉडेल मंधानाकडे आहे हे अद्याप कळलेले नाही. भारतात ऑडी कारची किंमत ही ४३.८५ लाखांपासून सुरु होते व २.५५ कोटींपर्यंत जाते.

BMW

भारतीय महिला क्रिकेट टीममधील स्मृती मंधानाच्या कर कलेक्शन मधील ४ ठी गाडी आहे ती म्हणजे BMW . याचेही तिच्याकडे कोणते मॉडेल आहे हे अद्याप कळले नाही आहे पण किंमत ही ४३.५० लक्ष ते २.६० कोटी इतकी आहे.

Range Rover

रेंज रोव्हर ही एसयूव्ही स्मृती मंधानाच्या कार कलेक्शनमधील शेवटची महागडी कार आहे जी तिने २०२२ मध्ये दिवाळीच्या काळात खरेदी केली होती. या लक्झरी एसयूव्हीची किंमत (एक्स-शोरूम, दिल्ली)७२.०९ लाख इतकी आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian cricketer smriti mandhana has a collection of cars like bmw creta dzire range rover tmb 01