भारतात दुचाकी खरेदीकडे सर्वाधिक कल असल्याचं पाहायला मिळतं. चारचाकीपेक्षा स्वस्त आणि वाहतूक कोंडीतून झटपट मार्ग काढता येतो म्हणून दुचाकीला सर्वाधिक पसंती मिळते. इंधन दरवाढीच्या दृष्टीने दुचाकींचा मायलेज देखील चांगला आहे. आता इलेक्ट्रिक दुचाकींची त्यात भर पडली आहे. असं असताना भारतीय दुचाकींची मागणी इतर देशांमध्येही मागणी वेगाने वाढत असल्याचं दिसत आहे. लॅटिन अमेरिकेत भारतीय मोटरसायकलींची मागणी गेल्या १० वर्षात झपाट्याने वाढली आहे. गेल्या १० वर्षात, मोटरसायकल बाजार ३.७ लाखांवरून ५.२ लाखांपर्यंत वाढला आहे. मेक्सिकोत मोटरसायकलला सर्वाधिक मागणी असून प्रथमच ब्राझीलची मागणी ४.६ टक्क्यांनी घसरली आहे. मोटरसायकलच्या वाढत्या मागणीमागे गतिशीलता, कमी व्याजदर, पर्यावरणपूरक अशी अनेक कारणं आहेत. गेल्या काही वर्षात भारतातून दुचाकी निर्यात वाढत आहे. मेक्सिको, ब्राझील आणि अर्जेंटिनानंतर लॅटिन अमेरिकेतील कोलंबियन मोटारसायकल बाजार चौथ्या क्रमांकावर आहे.

संदिप वासनिक यांच्या फायनान्शियल एक्स्प्रेसमध्ये आलेल्या लेखात नमूद करण्यात आलं आहे की, ५० सीसी पेक्षा जास्त परंतु २५० सीसीपेक्षा कमी सिलेंडर क्षमतेच्या रिसीप्रोकेटिंग इंटर्नल कंबशन पिस्टन इंजिन असलेल्या मोटरसायकलची मागणी सर्वाधिक आहे. निर्यातीचं प्रमाण करोना काळात वाढल्याचं चित्र आहे. ब्राझीलच्या मागणीत घट असली तर मार्केट सावरत आहे. तर कोलोबिंया मार्केट तिसऱ्या स्थानावर आहे. पेरू +४१.५ टक्के मागणीसह चौथ्या स्थानावर, ग्वाटेमाला +४९.७ टक्के मागणीसह पाचव्या, इक्वाडोर +८.९ टक्के मागणीसह सहाव्या स्थानावर आहे. मेक्सिकोत इटालिकाची मागणी ७० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यानंतर होंडा, वेंटो आणि कॅराबेला यांचा क्रमांक लागतो. इटालिकाने मेक्सिकोमध्ये हिरो मोटरसोबत वितरणासाठी भागीदारी करारावर स्वाक्षरी केली आहे. तर दुचाकींची वाढती मागणी पाहता बजाजने २०१९ मध्ये वर्षिक ५० हजार युनिट्स तयार करता येतील असा प्लांट सुरु केला आहे.

Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
hero splendor plus price hike
देशात सर्वाधिक विक्री होणारी ‘ही’ बाईक आता महाग; जाणून घ्या नवी किंमत
Shocking Viral Video Scooter rider drag a man for 1 km
बाईकस्वाराने भररस्त्यात ओलांडली क्रूरतेची मर्यादा! वृद्धाला स्कुटीला बांधत फरपटत नेलं अन्…; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
Mercedes Benz crosses 2 lakh car sales print eco news
‘मर्सिडीज बेंझ’कडून दोन लाख मोटारींची विक्री; ‘मर्सिडीज बेंझ’कडून दोन लाख मोटारींच्या विक्रीचा टप्पा सर
Mumbai transport department Japan policy
वाहन खरेदीवर नियंत्रण आणण्याचा परिवहन विभागाचा विचार, जपानच्या धर्तीवर नवे धोरण राबविणार
Tata Motors January Offer
Tata Motors January Discount : ग्राहकांसाठी खुशखबर! टाटा पंच ईव्ही अन् टाटा टियागो ईव्ही वर ८५ हजारांपर्यंत डिस्काउंट, जाणून घ्या सविस्तर
Here are the top five trending automotive topics on Google during December 2025
डिसेंबर २०२४ मध्ये Googleवर चर्चेत होत्या ‘या’ कार अन् बाईक्स, टॉप ५ ट्रेंडिंग ऑटोमोटिव्ह विषयांची यादी पाहा

Royal Enfield Scram 411 VS Yezdi Scrambler: किंमत, मायलेज आणि डिझाइन पाहून तुम्हीच ठरवा कोणती गाडी घ्यायची

ब्राझीलमध्ये दुचाकींची नोंदणी १२,६७,६४९(+६.२%) झाली आहे. गेल्या काही वर्षांतील सर्वोच्च आकडा आहे.भारतीय मोटारसायकल रॉयल एनफिल्डने ब्राझिलियन मोटरसायकल मार्केटमध्ये सातवे स्थान मिळवले आहे. मात्र दक्षिण अमेरिकन प्रदेशात सर्वात कमी नोंदणी झाली आहे. या भागात दोन आणि ती चाकी वाहनांची मागणी वाढत आहे. अर्जेंटिनामध्ये २०१९-२० या वर्षातील आर्थिक संकटामुळे मोटारसायकल मार्केटला जोरदार फटका बसला होता. विक्री ५,७२,२६६ (२०१८) वरून २,६३,७९५ (२०२०) पर्यंत घसरली होती. आता २०२१ मध्ये विक्रीत ५२.५ टक्क्यांची वाढ झाली असून भारतीय बजाज ऑटो सातव्या क्रमांकावर आहे.

Discount On SUV: ‘या’ कंपन्यांची एसयूव्हीवर २ लाखांपर्यंतची सूट, जाणून घ्या कोणत्या गाड्या आहेत

बजाज कंपनीचा १० वर्षांहून अधिक काळ मार्केटवर दबदबा होता. मात्र काही धोरणात्मक बदल आणि स्थानिक भागीदारी Auteco वरून UMA समूहाकडे गेल्याने काही प्रमाणात फटका बसला. Auteco ही कोलंबियातील सर्वात मोठी वितरक कंपनी आहे. आता बजाजने या भागात निर्यात करण्याच्या उद्देशाने ला तेबैडा, क्विंडिओ येथे प्लांट सुरु केला आहे. ज्यामध्ये मूळ कंपनीकडून आयात केलेल्या सामग्रीसाठी CKD ऑपरेशन्सचा समावेश आहे. या भागात पल्सर, डोमिनार, बॉक्सर, प्लॅटिना आणि डिस्कव्हरसह मोटारसायकल असेंबली लाइनसह ऑपरेशन सुरू झाले आहे. ग्वाटेमाला मोटरसायकल मार्केटमध्ये बजाज ऑटो ही सुझुकी आणि होंडाच्या पुढे आहे.

Story img Loader