भारतात दुचाकी खरेदीकडे सर्वाधिक कल असल्याचं पाहायला मिळतं. चारचाकीपेक्षा स्वस्त आणि वाहतूक कोंडीतून झटपट मार्ग काढता येतो म्हणून दुचाकीला सर्वाधिक पसंती मिळते. इंधन दरवाढीच्या दृष्टीने दुचाकींचा मायलेज देखील चांगला आहे. आता इलेक्ट्रिक दुचाकींची त्यात भर पडली आहे. असं असताना भारतीय दुचाकींची मागणी इतर देशांमध्येही मागणी वेगाने वाढत असल्याचं दिसत आहे. लॅटिन अमेरिकेत भारतीय मोटरसायकलींची मागणी गेल्या १० वर्षात झपाट्याने वाढली आहे. गेल्या १० वर्षात, मोटरसायकल बाजार ३.७ लाखांवरून ५.२ लाखांपर्यंत वाढला आहे. मेक्सिकोत मोटरसायकलला सर्वाधिक मागणी असून प्रथमच ब्राझीलची मागणी ४.६ टक्क्यांनी घसरली आहे. मोटरसायकलच्या वाढत्या मागणीमागे गतिशीलता, कमी व्याजदर, पर्यावरणपूरक अशी अनेक कारणं आहेत. गेल्या काही वर्षात भारतातून दुचाकी निर्यात वाढत आहे. मेक्सिको, ब्राझील आणि अर्जेंटिनानंतर लॅटिन अमेरिकेतील कोलंबियन मोटारसायकल बाजार चौथ्या क्रमांकावर आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा