Electric Bike: इलेक्ट्रिक बाईकची मागणी देशाअंतर्गत बाजारात सतत वाढत आहे. त्यामुळे वाहन निर्माता कंपन्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईकची नव-नवीन माॅडल लाँच करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आज बाजारात इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईकची एक मोठी रेंज उपलब्ध आहे. आज आपण भारतीयांनी पसंत केलेल्या चार इलेक्ट्रिक बाइक्स बद्दल जाणून घेणार आहोत.

‘या’ आहेत चार इलेक्ट्रिक बाईक

  • Torque Kratos

Torque Motors ने भारतात नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल Kratos लाँच केली आहे. दिल्लीत या ई-बाईकची एक्स-शोरूम किंमत १.२ लाख रुपये आहे. कंपनीने ही बाईक दोन प्रकारात उपलब्ध केली आहे. Kratos ला वेगळ्या प्रकारची इलेक्ट्रिक मोटर मिळते जी ७.५ kW पॉवर आणि २८ Nm पीक टॉर्क जनरेट करते. यामुळेच ही बाईक अवघ्या ४ सेकंदात 0-40 किमी/ताशी वेग पकडू शकते. स्टँडर्ड मॉडेलच्या तुलनेत त्याची टॉप स्पीड १०५ किमी प्रतितास आहे.

Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Crime against MNS candidate in Nashik East Constituency
नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट
Royal Enfield electric bike breaks cover globally royal enfield electric bike price features latest update
Royal Enfield ची पहिलीवहिली इलेक्ट्रीक बाईक लाँच; जबरदस्त लूक, फिचर्स अन् किंमत लगेच जाणून घ्या
Tata Motors profit falls 11 percent as vehicle sales decline
वाहनांची विक्री घसरल्याने टाटा मोटर्सच्या नफ्यात ११ टक्के घट;  दुसऱ्या तिमाहीत ३,३४३ कोटी रुपयांवर
What Poonam Mahajan Said About Pramod Mahajan ?
Poonam Mahajan : ‘प्रमोद महाजन यांना ठार करण्याचं षडयंत्र कशासाठी आखलं गेलं?’ पूनम महाजन यांचं उत्तर, “त्यांना…”
young mans mobile was stolen
पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकाविला
Municipal Commissioner Bhushan Gagrani warns Law Department not to delay in court cases
न्यायालयीन प्रकरणांत दिरंगाई नको, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा विधि विभागाला इशारा
  • HOP OXO Electric Motorcycle

१.२५ लाखाच्या सुरुवातीच्या किंमतीत येणारी, HOP OXO इलेक्ट्रिक मोटरसायकल पॉवरट्रेन म्हणून मागील चाक आरोहित हब मोटरचा वापर करते. या बाइकची लांबी २१०० मिमी, रुंदी ७९३ मिमी आणि उंची १०६५ मिमी इतकी आहे. तर बाइकचा ग्राऊंड क्लीअरन्स १८० मिमी इतका आहे. बाइकची सीट ७८० मिमी उंच आहे. नॉर्मल चार्जरने ही बाइक ८० टक्के चार्ज करण्यासाठी ४ तास लागतात. तर ५ तासात बाइक पूर्ण चार्ज होते. तर यातली पोर्टेबल बॅटरी चार्ज करण्यासाठी ७५ मिनिटे लागतात. या बाइकचा टॉप स्पीड ९० किमी प्रति तास इतका आहे. ही बाइक ४ सेकंदात ० ते ४० किमी प्रति तास इतका वेग धारण करू शकते.

(आणखी वाचा : नवीन गाडी आत्ताच खरेदी करू नका; पुढील वर्षांत १० लाखांच्या आत लाँच होतायत ‘या’ दमदार फीचर्ससह कार, पाहा यादी)

  • Komaki Ranger

१.६८ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत येत असलेल्या या इलेक्ट्रिक बाइकची रेंज १८०-२२० किमी आहे. ही मोटरसायकल शायनिंग क्रोम एलीमेंट्ससह येते. तसेच यामध्ये रेट्रो थीमचा राउंड एलईडी लॅम्प वापरण्यात आला आहे. या बाईकमध्ये एक हँडल देण्यात आले आहे. तसेच सिंगल पॉड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आलं आहे. तसेच, या बाईकचं डिझाईन बजाज अॅव्हेंजरसारखे दिसते. कंपनीने आधीच दावा केला आहे की ही रेंजर इलेक्ट्रिक क्रूझर मोटरसायकल ४ kWh बॅटरी पॅकसह येते, जी ५०००W मोटरला पॉवर देते.

  • Revolt RV400

९०,७९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत येणाऱ्या या बाईकमध्ये ३.२४kWh लिथियम-आयन बॅटरी मिळते, जी ३ kW इलेक्ट्रिक मोटरला सामर्थ्य देते. कंपनीचा दावा आहे की ही, मोटरसायकल एकाच चार्जवर १५६ किमीपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. RV400 बाइकचं वजन १०८ किलोग्रॅम असून चांगल्या हँडलिंगचा अनुभव मिळावा यासाठी कंपनीने तीन रायडिंग मोड्स दिलेत. यामध्ये ECO, Normal आणि Sport अशा तीन रायडिंग मोड्सचा समावेश आहे. ECO मोडमध्ये ४५ Kmph चा टॉप स्पीड आणि १५६ km रेंज मिळते. तर, Normal मोडमध्ये ६५Kmph चा टॉप स्पीड आणि ११० km रेंज मिळेल.