सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रेंडिंग व्हिडीओ बनवण्याची स्पर्धा तरुणांमध्ये लागली आहे. प्रचंड तरुणाई आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्वत:चे व्हिडीओ तयार करुन पोस्ट करु लागली आहेत. तुम्ही आतापर्यंत असे अनेक व्हिडीओ पाहिले असतील ज्यात लोक रस्त्याच्या मधोमध, रेल्वे स्टेशन किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी नाचू लागतात. ते जास्तीत जास्त दृश्ये आणि पसंती मिळविण्यासाठी हे करतात जेणेकरून ते स्वतःला सोशल मीडिया इन्फ्लुएंसर म्हणून स्थापित करू शकतील. अशा स्थितीत अनेक तरुण नियम आणि कायदे मोडायला चुकत नाहीत. अलीकडेच, इन्स्टाग्राम इन्फ्लुएंसरची अशीच कृती महागात पडली आहे.
अन् मारुती स्विफ्ट कारसमोर…
व्हिडीओ बनविणाऱ्या वैशाली चौधरी खुटेल या तरुणीने २३ जानेवारीला तिच्या इंस्टाग्राम हँडलवर रील अपलोड केला होता, ज्यामध्ये ती तिच्या कारसमोर पोज देताना दिसली होती. व्हिडिओमध्ये, ही तरुणी तिच्या लाल रंगाच्या मारुती स्विफ्ट कारसमोर बॉलिवूड गाण्यावर पोज देताना दिसली आहे. यासाठी तिने हायवेवरच कार पार्क केली होती. या व्हिडिओला आतापर्यंत 6 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि ७.५ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. मात्र, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गाझियाबाद पोलिसांचेही याकडे लक्ष वेधले गेले.
(हे ही वाचा : स्पोर्ट्स बाईक घ्यायच्या विचारात आहात, 30 हजारात घरी आणा Yamaha ची जबरदस्त फीचर्सवाली बाईक )
पाहा व्हिडीओ
पोलिसांनी केला गुन्हा दाखल
हायवेवर गाडी चुकीच्या पद्धतीने पार्क केल्याचे पोलिसांना या व्हिडीओमध्ये आढळून आले. यामुळे मोठ्या अपघातालाही निमंत्रण मिळू शकते. वाहतूक नियमांचे उल्लंघन पाहून पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता कारवाई करत या तरुणीवर चांगलाच दंड ठोठावला. गाझियाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही प्रकारची स्टंटबाजी, वाढदिवसाची पार्टी किंवा एलिवेटेड रस्त्यावर वाहतुकीला अडथळा आणणे हा कायदेशीर गुन्हा आहे. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. जवळच्या एलिव्हेटेड रोडवर या मुलीने कार थांबवून व्हिडिओ रील बनविली. या प्रकरणी ठाणे साहिबाबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून गाझियाबाद येथील पोलिसांनी १७ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.