इंधन दरवाढ आणि प्रदूषणाचा विचार करता इलेक्ट्रिक गाड्यांना पसंती दिली जात आहे. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये अत्याधुनिक टेक्नोलॉजी असल्याने या गाड्यामधून आवाज येत नाही. त्यामुळे आगामी काळात सामान्य वाहनांप्रमाणेच इलेक्ट्रिक कारमधून आवाज येण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी आवाजाच्या दिशेने सरकार काम करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र यामुळे ध्वनी प्रदूषण होईल, असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. हा विचार करून ई-कारसाठी खास व्हॉईस सिस्टीम बनवली जात आहे. जेणेकरून इतर वाहने आणि रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनाही रस्त्यावरून धावणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनाची माहिती मिळू शकेल. गाडीच्या आवाजाच्या मदतीने ते सतर्कतेने दूर जाऊ शकतील. आवाज नसल्यास त्यांना वाहनाची माहिती मिळणार नाही आणि भविष्यात ही गोष्ट अपघाताचे कारण ठरू शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अहवालात पुढे म्हटले आहे की, अवजड उद्योग मंत्रालयाने संबंधित विभागांना या संदर्भात शक्यता तपासण्यास सांगितले आहे. पर्याय उपलब्ध झाल्यानंतर या ई-वाहनांमधील आवाजाच्या प्रभावाचे मूल्यांकन केले जाईल. ई-कारमधून निघणाऱ्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण पसरत आहे का?, याची खातरजमा केली जाणार आहे. त्यानंतरच पर्यायाची अंमलबजावणी करण्याचे काम पुढे केले जाईल. तज्ज्ञांच्या मते, ई-वाहनांमधील आवाजाबाबतही नवीन नियम जारी केले जाऊ शकतात. आवाज फक्त एवढाच असावा की लोक सावध होऊन वाहनांना रस्ता देतील. यासाठी ई-कार्समध्ये अकॉस्टिक व्हेहिकल अलर्ट सिस्टीम असेल. हे एक प्रकारचे यंत्र आहे, ज्यामुळे कारमधून आवाज येतो.

Maruti Suzuki: १० लाख लोकांनी खरेदी केली ‘ही’ कार; नव्या वर्षात येणार नवं मॉडेल!

दरम्यान, ई-कारमधून आवाज येण्यासाठी जगभरात अभ्यास केले जात आहेत. सुरक्षितता लक्षात घेऊन हे केले जात आहे, जेणेकरून पादचाऱ्यांनीही रस्त्यावर सतर्क राहावे. अलर्टसाठी आवाज जोडल्यानंतरही ई-कार सामान्य वाहनांइतका आवाज करणार नाहीत, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. दुसरीकडे, २०३० पर्यंत देशात फक्त ई-वाहने चालवण्याचे लक्ष्य असल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे. असे मानले जाते की २०३० पर्यंत संपूर्ण भारतात १०० दशलक्षाहून अधिक इलेक्ट्रॉनिक वाहने असतील, तर तोपर्यंत इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ १५ लाख कोटींच्या आसपास असू शकते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Installing a special machine to make the sound of an electric car rmt