December good to buy car : अलिकडे कार कंपन्या आपल्या वाहनांवर मोठी सूट देत आहेत. मात्र, डिसेंबर महिन्यात तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आनंदाच्या क्षणांसह काही तोट्यांना देखील सामोरे जावू लागू शकते. डिसेंबर महिन्यात कार घेण्याचे काय फायदे आणि काय तोटे आहेत? याबाबत आज आपण जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवीन कार खरेदी करण्यासाठी डिसेंबर हा चांगला काळ का आहे?

(Bike Ride with Dog : व्यक्तीने श्वानासोबत दिल्ली ते लडाख असा बाईकने केला प्रवास, पाहा व्हिडिओ)

  • तज्ज्ञांनुसार, वर्षाच्या शेवटी कार निर्मिती कंपन्या कोणत्या कार्सची विक्री झाली नाही याचा आढावा घेतात आणि नंतर त्यावर सूट देतात.
  • एक्सचेंज ऑफरसाठी डिसेंबर हा चांगला महिना आहे. तुम्हाला जुन्या कारच्या बदल्यात नवीन कार घ्यायची असल्यास हा चांगला काळ आहे. कारण जानेवरीमध्ये एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतल्यास कार एक वर्ष जुनी होईल. तुम्ही ज्या डिलरकडून या ऑफरचा लाभ घ्याल तो तुम्हाला चालू वर्षाच्या किंमतीच्या आधारावर ऑफर देईल, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
  • डिसेंबर महिन्यात कार घेतल्यास तुमची बचत होऊ शकते. कारण नवीन वर्षात कार निर्मिती कंपन्या आपल्या उत्पदनांच्या किंमतीमध्ये वाढ करण्याची शक्यता असते. वाढती महागाई हे किंमत वाढवण्यामागील कारण असते.

डिसेंबर महिन्यात नवीन कार खरेदी का करू नये?

(रेहमान यांच्या मुलींना इलेक्ट्रिक वाहनाची भुरळ, खरेदी केली ‘ही’ स्पोर्ट कार, तिच्यात काय आहे खास? जाणून घ्या)

  • या महिन्यात सेलमध्ये मोठी सूट दिली जाते. कमी खर्चात नवीन कार खरेदी करता येईल या आशेने अनेक ग्राहक पूर्ण शहानिशा न करता, कार चांगली आहे की नाही, तिच्यात सुरक्षा फीचर उपलब्ध आहेत की नाही, या बाबी न तपासता तडकाफडकी सेलमधून कार घेतात आणि नंतर पश्चाताप होतो. त्यामुळे, सेलच्या जाळ्यात न फसता आधी कारबाबत पूर्ण माहिती घ्यावी.
  • डिसेंबरमध्ये खरेदी केलेली कार जानेवरीमध्ये खरेदी केलेल्या कारपेक्षा जुनी असते आणि याचा तिच्या रिसेल व्हॅल्यूवर प्रभाव पडतो. त्यामुळे कार खरेदी करताना याबाबत विचार करायला हवा.
  • डिसेंबरमध्ये कार खरेदी केल्यास तुम्हाला नवीन वर्षात लाँच होणाऱ्या नवीन कार्सला मुकावे लागू शकते. नवीन वर्षात नवे मॉडेल्स लाँच होतात. त्यामध्ये अधिक नवे तंत्रज्ञान मिळू शकते. त्यामुळे नवीन वर्षात खरेदी करणे योग्य ठरू शकते.

शेवटी वाहन केव्हा घ्यावे हे ग्राहकाच्या इच्छेवर अवलंबून असते. मात्र वाहन घेताना वरील बाबींचा विचार अवश्य करावा. त्याचबरोबर केवळ सेल आणि सूटच्या आहारी जाऊ नका. कारचे फीचर तपासा. तुमच्या बजेटमध्ये चांगली आणि सुरक्षा सुविधा उपलब्ध असणारी कार असेल तर तिला प्राधान्य द्या. मात्र, डिसेंबर महिन्यात कार घेण्यापूर्वी तिच्याबाबत संशोधन करायचे विसरू नका.