Is it dangerous to charge an electric car on rainy days: भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी ही प्रचंड वाढली आहे. पुढील १० वर्षात भारतीय रस्त्यांवर पेट्रोल आणि डिझेल वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहने अधिक दिसली तर नवल वाटायला नको. गेल्या चार वर्षात भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीत मोठी वाढ झाली आहे. इलेक्ट्रिक वाहने अधिक लोकप्रिय होत आहेत. वेगाने वाढणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांबाबत काही समस्या आहेत आणि काही मोठे प्रश्नही निर्माण झाले आहेत. सध्या ईव्ही मालकांसमोरचा सर्वात मोठा प्रश्न पावसाळ्याचा आहे. पावसाच्या आगमनाने इलेक्ट्रिक वाहनधारकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. यामुळे विजेचा धक्का बसण्याची भीती आहे. या पावसाळ्यात इलेक्ट्रिक वाहन चार्ज करणे सुरक्षित राहील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पावसाळ्यात इलेक्ट्रिक वाहनातून विजेचा झटका येण्याचा धोका असेल का? चला तर आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे समजून घेऊया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे खरे आहे की, इलेक्ट्रिक वाहन चार्ज करण्यासाठी एसी (Alternate current) DC (Direct Current) मध्ये रूपांतरित केले जाते आणि ते धोकादायक आहे. त्याच्या तावडीत आल्यास जीवितास धोकाही आहे. त्याचबरोबर पाण्याच्या संपर्कात आल्याने वीज पडण्याचाही धोका आहे. चला तर मग आज आम्ही तुम्हाला सांगतो की, या पावसाळ्यात तुमची इलेक्ट्रिक कार किंवा स्कूटर धोकादायक ठरू शकते की नाही.

(हे ही वाचा : Maruti च्या लोकप्रिय कारवर ऑफर्सचा पाऊस, फक्त दोन दिवस बाकी, मायलेज ३६ किमी )

पावसाळ्यात तुमच्या इलेक्ट्रिक कारला इलेक्ट्रिक शॉक लागू शकतो का?

कोणत्याही परिस्थितीत इलेक्ट्रिक वाहनाने विजेचा धक्का लागण्याची शक्यता नाही. हे आपण सविस्तर समजून घेऊ. इलेक्ट्रिक वाहनाला चार्जिंगसाठी फीमेल पिन असते. या पिनचे आवरण उष्णतारोधक रबराने केले जाते. हे अशाप्रकारे डिझाइन केले आहे की, ते पाण्यात भिजले तरी त्याचे फीमेल नोड्स कवर्ड राहतात. दुसरीकडे, तुमच्या वाहनाच्या चार्जरमध्ये दोन ठिकाणी मेल पिन आहेत. जर तुमच्याकडे फास्ट चार्जर असेल तर त्याचा इनटेक पॉईंट म्हणजेच वीज पुरवठा लाइनला जोडलेला पॉइंट देखील इन्सुलेटेड रबरने झाकलेला असतो. ते ओले असतानाही मोकळ्या मनाने प्लग इन करा. दुसऱ्या बाजूचा बिंदू म्हणजे वाहन.

आता अशा परिस्थितीत चार्जर किंवा चार्जिंगदरम्यान विजेचा शॉक लागण्याचा धोका नाही, ही बाब स्पष्ट झाली आहे. आता प्रश्न पडतो की तुमचे इलेक्ट्रिक वाहन इलेक्ट्रिक शॉक देऊ शकते का? उत्तर पूर्णपणे नाही, परंतु काही प्रकरणांमध्ये असे दिसून आले आहे की, पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर इलेक्ट्रिक वाहनात शॉर्ट सर्किट झाले, हे का घडले ते आपण समजून घेऊया.

(हे ही वाचा : १, २, किंवा ६ विसरुन जाल, ‘या’ लक्झरी कारमध्ये १० एअरबॅग्स? सेफ्टी फीचर्स पाहून व्हाल थक्क)

शॉर्ट सर्किट होण्याचे मुख्य कारण काय?

इलेक्ट्रिक वाहनाच्या सर्व तारा आणि बॅटरी झाकल्या जातात आणि पाण्याच्या संपर्कात आल्यावरही वीज गळती होत नाही. याचे कारण इन्सुलेटिंग रबर कव्हरिंग आहे.

इलेक्ट्रिक वाहनात शॉर्ट सर्किट होण्याचे मुख्य कारण म्हणजे कार किंवा स्कूटरमध्ये बाजारातील कोणत्याही प्रकारची उपकरणे फिट करणे. कार किंवा स्कूटरमध्ये कोणतीही इलेक्ट्रिक ऍक्सेसरी बसवण्यासाठी वायरिंग कापावी लागते. या प्रकरणात तारा नग्न होतात, म्हणजेच ते उघडे राहतात. या तारांशी पाण्याचा संपर्क आल्यास शॉर्ट सर्किटची समस्या उद्भवते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is it dangerous to charge an electric car on rainy days can electric cars be charged in rainy weather pdb