City Transformer CT-2 Electric Car: इस्रायल आधारित इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप सिटी ट्रान्सफॉर्मर आपली मिनी इलेक्ट्रिक कार ‘CT-2 EV’ लवकरच बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. अतिशय आकर्षक लूक आणि शक्तिशाली बॅटरी पॅकने सजलेल्या या मिनी इलेक्ट्रिक कारचा आकार हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. प्रचंड गर्दी आणि अवजड वाहतूक असलेल्या शहरांमध्ये ही मिनी कार दैनंदिन वापरासाठी वाहतुकीचा सर्वोत्तम पर्याय ठरेल, असा विश्वास कंपनीला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुख्य कार्यकारी असफ फॉर्मोसा यांनी रॉयटर्सला सांगितले की, “कंपनीने आतापर्यंत $20 दशलक्ष उभे केले आहेत, पश्चिम युरोपमधील एक कारखाना निवडला आहे जिथे कारचे उत्पादन केले जाईल. सुरुवातीला कंपनी दरवर्षी १५,००० युनिट्स तयार करेल.” कंपनीने प्लांटच्या लोकेशनबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. फॉर्मोसा म्हणाले, “स्टार्टअप अधिक गुंतवणूक वाढवत आहे जेणेकरून त्याचे उत्पादन लवकर आणि चांगले सुरू करता येईल.”

(हे ही वाचा : Mahindra च्या ‘या’ इलेक्ट्रिक SUV ची ५ दिवसातच झाली बंपर बुकिंग, खरेदीसाठी लागल्या रांगा )

कार दोन मोडमध्ये चालवता येणार

युरोपियन युनियन आणि ब्रिटनमध्ये या कारच्या वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, कार दोन मोडमध्ये चालवता येते, एक परफॉर्मन्स मोड आणि दुसरा सिटी मोड. परफॉर्मन्स मोडमध्ये गाडी चालवताना, व्हीलबेस वाढतो आणि कारची चारही चाके स्वतःहून थोडी बाहेर येतात. यामुळे कारची कार्यक्षमता देखील वाढते, ज्या दरम्यान तिचा टॉप स्पीड ९० किमी प्रतितास होतो. जेव्हा तुम्ही कार परफॉर्मन्स मोडमध्ये चालवत असता आणि तुम्हाला कार अरुंद भागात पार्क करायची असते, तेव्हा तुम्हाला फक्त ती सिटी मोडवर स्विच करायची असते. असे केल्याने गाडीची चाके आतील बाजूस येतात आणि गाडीची रुंदी कमी होते.

CT-2 ची लांबी २,५०० मिमी, रुंदी १,४०० मिमी (परफॉर्मन्स मोड), उंची १,५८० मिमी आणि व्हीलबेसमध्ये १,८०० मिमी आहे. दुसरीकडे, सिटी मोड कारची रुंदी १,००० मिमी इतकीच राहते. या कारच्या मागील बाजूस सामानाची जागा (बूट) देखील देण्यात आली आहे जी सिंगल सीटसह येते, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आवश्यक गोष्टी सहज ठेवू शकता.

ड्रायव्हिंग रेंज

या कारचे एकूण वजन फक्त ४५० किलो आहे. यामध्ये प्रत्येकी ७.५ किलोवॅट क्षमतेच्या दोन इलेक्ट्रिक मोटर्स देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे या कारचा टॉप स्पीड ताशी ९० किलोमीटरपर्यंत पोहोचला आहे. कंपनीचा दावा आहे की ही कार एका चार्जमध्ये १८० किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देण्यास सक्षम आहे. पिकअपच्या बाबतीतही ही मिनी कार कमी नाही, अवघ्या ५ सेकंदात ही कार ताशी ० ते ५० किलोमीटरचा वेग पकडते. या कारची बॅटरी केवळ 1 तासात डीसी चार्जरने पूर्ण चार्ज होऊ शकते.

(हे ही वाचा : Hero Xoom 110cc स्‍कूटर लाँच, प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या स्‍कूटरला मिळतील ‘हे’ जबरदस्त फीचर्स, किंमत… )

कधी होणार लाँच?

सुरुवातीला, ही इलेक्ट्रिक कार युरोपियन बाजारपेठेत सादर केली जाईल. पुढील वर्षी २०२४ पर्यंत बाजारात लाँच केली जाऊ शकते. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर या इलेक्ट्रिक कारची प्री-ऑर्डर बुकिंगही सुरू करण्यात आली आहे. युरोप व्यतिरिक्त इतर बाजारपेठेत ते कधी सादर केले जाईल याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

किंमत काय असेल?

१ मीटरच्या जागेत सहज पार्क करता येणार्‍या या छोट्या कारच्या किमतीबाबत फॉर्मोसा म्हणतो, “टॅक्सशिवाय, CT-2 ची किंमत १६,००० युरो (सुमारे १४.२० लाख रुपये) असेल.