Mercedes Car Gift: कामावर निष्ठा असेल आणि कामाप्रती प्रामाणिकपणा असेल तर त्याचे फळ हे मिळतेच. अनेक कंपन्या त्यांच्या अशा प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा सन्मान करतात, त्यांना वेगवेगळे गिफ्ट्स देतात. असाच प्रकार हा केरळमध्ये घडला आहे. केरळमधील एका कंपनीने आपल्या एका निष्ठावान कर्मचाऱ्याला प्रोत्साहन देण्यासाठी असे कृत्य केले, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या सेवेच्या बदल्यात कंपनीने आपल्या जुन्या कर्मचाऱ्याला एक नवी कोरी मर्सिडीज कार भेट दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इंन्स्टाग्रामवर केला फोटो शेअर

हे काम केरळचे उद्योगपती एके शाजी यांनी केले आहे. ते MyG च्या किरकोळ आउटलेट चेनचे मालक आहेत. आणि केरळमध्ये १०० हून अधिक स्टोअर्स चालवत आहेत. त्यांनी गेल्या २२ वर्षांपासून त्याच्यांसोबत काम करत असलेल्या सीआर अनिशला सुमारे ४५ लाख रुपयांची मर्सिडीज-बेंझ जीएलए क्लास २२०डी (Mercedes-Benz GLA Class 220d) भेट दिली. शाजीने याबाबतचे फोटो आणि व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

(हे ही वाचा : जबरदस्त मायलेज अन् किंमतही अगदी कमी ‘या’ ५ लोकप्रिय कार तुम्हाला येत्या एका महिन्यात खरेदी करता येणार नाही )

कंपनी मालक म्हणाले – कर्मचारी नाही, जवळचा मित्र

एका व्हिडीओमध्ये शाजी यांनी कार गिफ्ट केल्यानंतर कर्मचारी अनिशचे कौतुक केले आहे. अनिश हा केवळ कर्मचारी नसून त्याचा चांगला मित्र असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ते म्हणाले, ‘प्रिय अनिश, गेली २२ वर्षे तू आमच्यासाठी एक मजबूत आधारस्तंभ आहेस. आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ही भेट आवडेल. भेटवस्तूवर प्रतिक्रिया देताना सीआर अनिश म्हणाले की, हे त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट आहे.

शाजीने कर्मचाऱ्यांना यापूर्वीही गाड्या भेट दिल्या आहेत

किरकोळ आउटलेट फर्म MyG ची स्थापनाही झाली नसल्यापासून सीआर अनिश शाजीसोबत काम करत आहे. ते सध्या MyG येथे मुख्य व्यवसाय विकास अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी शाजीच्या व्यवसायात मार्केटिंग, मेंटेनन्स, युनिट डेव्हलपमेंट अशा अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. याआधीही शाजीने आपल्या कर्मचाऱ्यांना अशाप्रकारे आश्चर्यचकित केले आहे. सुमारे २ वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या ६ कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट केल्या होत्या.