Car Starting Problem: हिवाळा हंगाम सुरू झाला आहे. या दरम्यान अनेकजणांना वाहन सुरू करताना खूप त्रास होतो. अनेक वेळा लोक त्यात तासन्तास घालवतात, त्यानंतरही वाहन सुरू होत नाही. तसे, हे विशेषतः तेव्हा घडते जेव्हा एखादे वाहन गॅरेजमध्ये किंवा घराच्या पार्किंगमध्ये महिन्यांपासून पडून असते. दीर्घकाळ वापर न केल्यामुळे अशा समस्या उद्भवतात. तुमचेही एखादे वाहन महिनोनमहिने बंद पडलेले आहे आणि ते क्षणार्धात चालू करायचे आहे का, यासाठी तुम्हाला जास्त वाट पाहण्याची गरज नाही. या टिप्सच्या मदतीने तुम्ही बरेच दिवस थांबलेले वाहन सुरू करू शकता.
गाडीची बॅटरी
गाडीची बॅटरी आणि इंजिन प्रामुख्याने थंड हवामानात प्रभावित होऊ शकतं. त्यामुळे गाडी सुरू करताना अनेक समस्या उद्भवू शकतात. बॅटरी जुनी असेल, तर ती बदला. अन्यथा बॅटरीच्या सर्व केबल्स आणि त्यामधल्या पाण्याची पातळी तपासा. इंजिन तेल तपासा आणि आवश्यक असल्यास बदला. कारण कमी तापमानात द्रव गोठू शकतात.
वेळेवर सर्व्हिसिंग
हिवाळ्यात सकाळी गाडी सुरू न झाल्यामुळे लोक नाराज होतात. ज्यांची सर्व्हिसिंग वेळेवर होत नाही अशा वाहनांना अधिक समस्यांना सामोरे जावे लागते. सर्व्हिसिंग आवश्यक आहे कारण इंजिनमध्ये वापरलेले इंजिन तेल जास्त वापरानंतर घट्ट होते आणि हिवाळ्याच्या हंगामात ते गोठण्याची शक्यता असते.
(हे ही वाचा : Puncture Fraud: गाडी पंक्चर झालीये? दुकानदारानं तुम्हालाही गंडविलं तर, फसवणूक टाळण्यासाठी मग ‘हे’ कराच! )
इंधन तपासा
सीएनजी गाडी सुरू न झाल्याने लोक खूप नाराज होतात. असे सहसा घडते जेव्हा एखादे वाहन महिनाभर एकाच ठिकाणी उभे असते. ते सुरू करण्यात काही अडचण येत असेल तर सर्वप्रथम पेट्रोल तपासा. जास्त काळ वापर न केल्यास पेट्रोलचे बाष्पीभवन होते. सीएनजी कार सुरू करण्यासाठी त्यामध्ये पुरेसे पेट्रोल असणे अत्यंत आवश्यक आहे. यासोबतच सीएनजीवर चालवण्यासाठीही पेट्रोल आवश्यक आहे.
बोनट उघडून तपासा
पेट्रोल आणि सीएनजी असूनही एखादे वाहन सुरू होत नसेल तर सर्वप्रथम बॉनेट उघडून बॅटरी तपासा. हिवाळ्याच्या मोसमात जास्त वेळ गाडी न चालवल्यास बॅटरी आपोआप डिस्चार्ज होते. बोनेट उघडल्यानंतर, बॅटरीला जोडलेल्या तारा एकदा तपासा. काही वेळा त्यात गंज लागल्याने वाहन सुरू होत नाही.
(हे ही वाचा: Second Hand Car खरेदीचा विचार करताय? ‘हे’ जबरदस्त फायदे जाणून घ्या, नवीन कार खरेदीचा विचारही करणार नाही!)
वायरिंग तपासा
मीटरमध्ये लाईट येत नसेल तर प्रथम वायरिंग तपासा. कार पार्किंगमध्ये जास्त वेळ ठेवल्यास उंदीर तारेला चावू शकतात. त्यामुळे अनेकवेळा लोकांना वाहन सुरू करताना अडचणी येतात. वायरिंगमध्ये काही अडचण असल्यास ती पाहून तुम्ही कार सुरू करू शकता. वाहन पार्क करताना ते स्वच्छ ठिकाणीच ठेवावे.
टायर्सची काळजी घ्या
प्रत्येक ऋतूत टायर्सची काळजी घेणे गरजेचे आहे. हिवाळ्यात टायर्समधील हवेचा दाब योग्य असला पाहिजे कारण थंड वातावरणात आर्द्रतेमुळे रस्ते ओले राहतात आणि ओल्या रस्त्यावर घसरण्याची भीती वाढते. टायर खूप झिजले असतील तर ते बदलून घ्या.