Lamborghini Urus S Launched: इटलीची लक्झरी स्पोर्ट्स कार निर्माता कंपनी Lamborghini ने आज भारतीय बाजारपेठेत नवीन ‘2023 Urus S’ लाँच केले आहे. कंपनीने ही कार दोन प्रकारांमध्ये सादर केली आहे, तिच्या बेस मॉडेलची किंमत ४.१८ कोटी रुपये आणि Urus Performante व्हेरिएंटची किंमत ४.२२ कोटी रुपये (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे. दोन्ही व्हेरियंटमध्ये सुमारे ४ लाख रुपयांचा फरक आहे.

नवीन Urus S मागील मॉडेलच्या बदली म्हणून सादर करण्यात आले आहे, ते मागील मॉडेलपेक्षा अधिक स्पोर्टी आणि लक्ज़रीयस आहे आणि चांगले कार्यप्रदर्शन देते. कंपनीने त्याच्या बाह्य आणि आतील भागात बरेच मोठे बदल केले आहेत, ज्यामुळे ती एक चांगली स्पोर्टी SUV बनते.

new ST buses in phased manner 110 buses have been made available
एसटीच्या नवीन गाड्या मिळवण्यासाठी लोकप्रतिनिधींमध्ये चुरस… तोटा झाल्यास सरकारकडून…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
car
Maruti Suzuki Price Hike: १ फेब्रुवारीपासून मारुती सुझुकीच्या कार महागणार! कोणत्या कारची किंमत किती वाढली आहे?
soybean procurement target for 2024 25 has adjusted based on district responses
राज्यात सोयाबीन खरेदीमध्ये सहा जिल्ह्यांच्या उद्दिष्टांना कात्री
navi mumbai municipal administration once again started activities to set up charging stations at 124 places in the city
१२४ ठिकाणी नवी चार्जिंग स्थानके, इलेक्ट्रिक वाहन धोरणासाठी नवी मुंबई महापालिकेचा पुन्हा प्रयत्न
Kia Syros SUV price features
KIA च्या ‘या’ कारची लाँच आधीच बुकिंग सुरू; नेमकी इतकी मागणी का? फीचर्स काय आहेत, जाणून घ्या
Shark Tank Season 4 judges are well known in the country and here are the cars they own
BMW ते Mercedes-Benz पर्यंत… शार्क टँकचे १० शार्क्स या आलिशान कारचे आहेत शौकीन? वाचा कोणाकडे आहे कोणती कार?
Maruti Suzuki car price loksatta news,
‘या’ कार कंपनीकडून वाहनांच्या किमतीत मोठी वाढ

Lamborghini Urus S मध्ये, कंपनीने ४.० लिटर क्षमतेचे ट्विन-टर्बो V८ पेट्रोल इंजिन दिले आहे, जे ६६६hp ची मजबूत पॉवर आणि ८५० Nm टॉर्क जनरेट करते. हे शक्तिशाली इंजिन ८-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्सशी जोडलेले आहे, जे सर्व चाकांना पॉवर वितरीत करते. कंपनीचा दावा आहे की, Urus S फक्त ३.५ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग पकडू शकतो. त्याचा टॉप स्पीड ३०५ किलोमीटर प्रति तास आहे.

(हे ही वाचा : भारतीयांचं लक्झरी कारप्रेम वाढलं, १ कोटींहून महागड्या कार्सना जोरदार मागणी, मर्सिडीज-बेंझने तीन महिन्यात विकल्या ‘इतक्या’ कार )

दोन्ही मॉडेल्समध्ये काय फरक आहे?

Urus S आणि Urus Performante मधील सर्वात मोठा फरक म्हणजे सस्पेंशन सेट-अप. परफॉर्मन्स व्हेरियंटमध्ये फिक्स्ड क्वॉल स्प्रिंग देण्यात आले आहे तर बेस मॉडेलमध्ये एअर सस्पेंशन उपलब्ध आहे. बेस मॉडेलला तीन राइडिंग मोड (सँड, स्नो आणि मड) मिळतात, तर परफॉर्मंटला फक्त एक ऑफरोडिंग मोड मिळतो, ज्याला कंपनी ‘Rally’ म्हणते.

Urus S मध्ये काय आहे खास?

इंजिन: ४.०L V8
पॉवर: ६६६hp
टॉप स्पीड: ३०५ किमी प्रतितास
किंमत: ४.१८ कोटी रुपये

Lamborghini ने या SUV मध्ये २१-इंच अलॉय व्हील्स मानक म्हणून दिले आहेत, जरी २२-इंच आणि २३-इंच अलॉय व्हील देखील पर्याय म्हणून उपलब्ध आहेत. या SUV मध्ये पूर्णपणे नवीन फ्रंट बंपर देण्यात आला आहे. Urus ची ही सर्वोत्तम आणि परफॉर्मन्स आवृत्ती असल्याचा कंपनीचा दावा आहे. दोन्ही व्हेरियंटमध्ये समान इंटीरियर डिझाइन देण्यात आले आहे, परंतु त्यात भिन्न सामग्री वापरण्यात आली आहे. Urus Performante ला ब्लॅक Alcantara इंटिरियर्स मानक म्हणून मिळतात, तर Urus S ला लेदर इंटिरियर्स मिळतात.

Story img Loader