दिल्लीस्थित टेक उत्पादने निर्माता iVOOMi एनर्जीने तीन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर S1, Jeet आणि Jeet Pro लॉन्च केल्या आहेत. या तिन्ही इलेक्ट्रिक स्कूटर स्मार्ट तंत्रज्ञानासह येत आहेत. त्याच्या स्मार्ट तंत्रज्ञानामध्ये EVs मध्ये Find My Scooter, 30L विशाल बूट स्पेस, पार्किंग असिस्ट आणि USB चार्जिंग पोर्ट यांसारख्या फिचर्सचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतात एकीकडे चांगल्यातल्या चांगल्या रेंजच्या आणि अतिशय महागड्या इलेक्ट्रिक स्कूटर मिळत आहेत. दुसरीकडे आता बजेट इलेक्ट्रिक स्कूटर सादर करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये iVoomi Jeet ची किंमत 82,000 रुपये आहे, तर iVoomi Energy S1 ची किंमत 85,000 रुपये आहे. याशिवाय iVOOMi Jeet Pro 93,000 रुपयांना खरेदी करता येईल. या किमती एक्स-शोरूमनुसार आहेत, पण सबसिडीवर त्या आणखी कमी असू शकतात.

आणखी वाचा : Komaki Electric या दिवशी नवीन हायस्पीड इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार

iVOOMi इलेक्ट्रिक स्कूटर्स लाल, निळा आणि राखाडी या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये ऑफर केल्या आहेत. कंपनीचे उद्दिष्ट आधुनिक तंत्रज्ञानाला लोक-ते-लोकांचे सहयोगी बनवणे आहे. कंपनीचे उत्पादन प्रकल्प नोएडा, पुणे आणि अहमदनगर येथे आहेत.

कंपनी iVoomi Jeet आणि Jeet Pro मध्ये 1.5kw-2kW बॅटरी पॅक ऑफर करत आहे, जे एका चार्जवर 130Km पर्यंत पोहोचण्याचा दावा करते. ईव्हीएसचे ग्राउंड क्लीयरन्स 170 मिमी आहे. ही फाइंड माय स्कूटर, 30L विशाल बूट स्पेस, पार्किंग असिस्ट आणि USB चार्जिंग पोर्ट फीचर्स मिळतील. याशिवाय, कंपनी ईव्हीमध्ये ‘प्रीमियम डिझाइन आणि अल्ट्रा-पॉवरफुल बिल्ड’ देखील ऑफर करत आहे.

दुसरीकडे, iVOOMi Energy S1 मध्ये 60V, 2.0kW स्वॅप करण्यायोग्य Li-ion बॅटरी पॅक करते, जी ४ तासांत पूर्ण चार्ज होईल, असा दावा केला जातो. कंपनीचे म्हणणे आहे की, ते डिस्क ब्रेकसह आणि पूर्ण चार्जसह 115km/ताशी सर्वोच्च गती देऊ शकते. पण, एनर्जी S1 च्या केंद्रस्थानी 2KW ची इलेक्ट्रिक मोटर आहे जी 65km/ताशी सरासरी गती देते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ivoomi energy launched three new electric scooters with 115kmph top speed to 130km range in india prp
Show comments