शिर्डीच्या साईबाबांची ख्याती महाराष्ट्र आणि देशातच नाही तर जगभरात पोहोचलेली आहे. त्यामुळेच दररोज हजारो भाविकांचे पाय शिर्डीकडे वळलेले दिसतात. हे भाविक साईबाबांचं मनोभावे दर्शन घेतात आणि आपआपल्या कुवतीनुसार साईचरणी भेटही अर्पण करतात. आता नुकतीच साईबाबांच्या चरणी ३१ लाख रुपयांची महागडी कार साईचरणी अर्पण करण्यात आली आहे. चला तर जाणून घेऊया ही कार कोणती, आणि या कारचे फीचर्स, कसे आहेत..
ही महिंद्राची दमदार एसयूव्ही कार आहे. या कारला लोकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. अलीकडेच कंपनीने या वाहनाच्या १ लाख युनिटचा आकडा पार केला आहे. कंपनीची ही एक दमदार SUV असून १ लाख लोकांनी खरेदी केली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे २ वर्षांपेक्षा कमी कालावधीत या कारने १ लाख युनिट्सचा टप्पा पार केला आहे.
साईचरणी तब्बल ३१ लाख रुपयांची महिंद्राची ‘ही’ कार अर्पण
महिंद्राची दमदार एसयूव्ही ‘Mahindra XUV 700′ नं बाजारात चांगलाच जम बसवला आहे. ही ३१ लाखाची कार साईचरणी अर्पण करण्यात आली आहे. Mahindra XUV700 MX आणि AX ट्रिम्स मध्ये उपलब्ध आहे.
(हे ही वाचा : मारुतीने सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या SUV मध्ये केला बदल, दिसणार नाहीत काही सेफ्टी फीचर्स? खरेदी करण्यापूर्वी तपासा )
Mahindra XUV 700 इंजिन
Mahindra XUV700 दोन इंजिन ऑप्शन सोबत उपलब्ध आहे. XUV700 पेट्रोल व्हेरियंटमध्ये एक २.० लीटर, ४ सिलिंडर टर्बो इंजिन मिळते. हे इंजिन २०० बीएचपीचे पॉवर आणि ३८० एनएमचे पीक टॉर्क जनरेट करते. तर डिझेल व्हेरियंटमध्ये २.२ लीटर, ४ सिलिंडर mHawk टर्बो इंजिन मिळते. हे इंजिन १५५ बीएचपीचे पॉवर आणि ३६० एनएमचे टॉर्क जनरेट करते. तर व्हेरियंट्स मध्ये हे इंजिन ४२० एनएम आणि ४५० एटी सोबत १८५ बीएचपची पॉवर जनरेट करते.
दोन्ही इंजिन ६ स्पीड मॅन्युअल आणि ६ स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्स सोबत उपलब्ध आहे. डिझेल व्हेरियंट फक्त मॅन्युअल ट्रान्समिशन सोबत आणले आहे. या एसयूव्हीमध्ये ४ ड्राइव्ह मोड्स जीप, जॅप, झूम, आणि कस्टम मिळते. या कारमध्ये ७ एअरबॅग्ज देण्यात आले आहेत.
साईचरणी Mahindra XUV 700 कोणी दिली भेट?
भारत देशातील उद्योगपती महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक जगदिशचंद्र महिंद्रा आणि कैलासचंद्र महिंद्रा यांनी साईचरणी ही कार भेट दिली आहे. त्यांनी आतापर्यंत साईबाबा संस्थानला विविध प्रकारची १७ वाहने भेट दिली आहेत. ताफ्यात महिंद्रा कंपनीची ही अठरावी गाडी भेटस्वरूपात प्राप्त झाली असल्याचे संस्थानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या वाहनाची मंदिरातील पुजाऱ्यांच्या हस्ते पुजा करण्यात आली व साई संस्थानच्या अधिकाऱ्यांकडे गाडीची कागदपत्रे व चाव्या सुपुर्द करण्यात आल्या.