Jaguar company launched new logo: लक्झरी कारसाठी ओळखल्या जाणाऱ्या जॅग्वार कंपनीने त्यांचा लोगो बदलला आहे. जग्वारने आपल्या कंपनीचा आयकॉनिक लोगो तब्बल १०२ वर्षांनी चेंज केला आहे. कंपनीने मंगळवारी ही घोषणा केली आहे. जॅग्वार कंपनी त्यांच्या सीडान आणि महागड्या कारसाठी खूप प्रसिद्ध आहे. जगभरात जॅग्वार कारचे चाहते आहेत. आत्तापर्यंत कंपनीने जगभरात विविध प्रकारचे मॉडल जारी केले आहेत. आता कंपनी २०२६ साली संपूर्णपणे इलेक्ट्रिक कार निर्माता म्हणून बाजारात उतरण्याची तयारी करत आहेत. त्यामुळंच कंपनीने त्यांचा आयकॉनिक लोगो बदलला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार हा लोगो अपकमींग जग्वार इलेक्ट्रिक GT कॉन्सेप्टवर पाहायला मिळेल. ज्यामुळे या इलेक्ट्रिक कार पूर्णपणे नवीन दिसतील. याव्यतिरिक्त, जग्वारने F-Pace चे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, जे या वर्षाच्या अखेरीस जागतिक बाजारपेठेत विक्रीसाठी जाणारे शेवटचे मॉडेल असेल.आधीच्या आणि आत्ताच्या लोगोमध्ये काय आहे बदल? जाणून घेऊयात.

Chhaava Movie New Release Date
तारीख ठरली! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार बहुप्रतीक्षित ‘छावा’ चित्रपट; विकी कौशल म्हणाला, “३४४ वर्षांनंतर…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
New Honda Dio 2025
New Honda Dio 2025 : ७५ हजारांमध्ये लाँच झाली नवीन होंडा डियो; जाणून घ्या, काय आहेत नवीन फीचर्स
Renault Triber Discount On 63,000 Rupees In January 2025 Check Specification & Features Details
नवीन कार घेण्याचा विचार करताय? या ७ सीटर कारवर मिळत आहे मोठी सूट; आत्ताच खरेदी केल्यास होईल ६३,००० रुपयापर्यंतचा फायदा
madhuri dixit car Ferrari 296 GTB price
Video: माधुरी दीक्षितने घेतली आलिशान गाडी, किंमत वाचून थक्क व्हाल
Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
Honda Laucned Black Edition and Signature Black Edition
Honda Elevate: होंडाची नवीन एलिव्‍हेट ‘ब्‍लॅक एडिशन’ लाँच! पॉवरफुल एसयूव्ही ह्युंदाई क्रेटाशी करणार स्पर्धा; पाहा किंमत अन् जबरदस्त फीचर्स
New Car Launch Tata launches Tiago and Tigor in 2025
५ लाखांत टाटाने लाँच केली नवी कार! अपडेटेड Tiago आणि Tigor चे फीचर्स एकदा बघाच; थेट Marutiला देत आहे टक्कर

आधीच्या आणि आत्ताच्या लोगोमध्ये काय आहे बदल?

जॅग्वारनं आपल्या नवीन लोगोचं यावेळी सादरीकरण केलंय. ज्यामध्ये नवीन ‘डिव्हाइस मार्क’ आणि ‘लीपर’ मेकर मार्कचा समावेश आहे. नवीन डिव्हाइस मार्क स्वच्छ आणि साध्या फॉन्टमध्ये “जॅग्वार” सादर करण्यात आलाय. तर मेकर मार्कमध्ये क्लासिक लीपर लोगोची नवीन आवृत्ती आहे. मोनोग्राम लोगोची जागा आता वर्तुळाकार लोगोनं घेतली आहे ज्यामध्ये दोन ‘J’ अक्षरे एकमेकांच्या विरुद्ध कोनात दिसताय. तर जुन्या मोनोग्राम लोगोमध्ये आधी ‘अंग्री टायगर’ चा लोगो होतो जो आता राउंडमध्ये तयार करण्यात आला आहे.

हेही वाचा >> Activa Electric: इलेक्ट्रिक स्कूटर घेत आहात? होंडाची इलेक्ट्रिक एक्टिव्हा लवकरच बाजारात; जाणून घ्या काय असेल किंमत

२ डिसेंबर २०२४ रोजी मियामी आर्ट वीक येथे आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष कार्यक्रमात जग्वारच्या नवीन ब्रँडचे अनावरण करण्यात येईल. तसेच जग्वारच्या आगामी पूर्णपणे इलेक्ट्रिक लाइन-अपचे पहिले मॉडेल असेल, जे २०२६ मध्ये लाँच केले जाईल.

Story img Loader