Yamaha RD350 Be Re-Launched?: भारतीय मोटारसायकल मार्केटमध्ये मिडलवेट सेगमेंट झपाट्याने वाढत आहे. यामुळेच अनेक कंपन्या यामध्ये हात आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या या विभागात रॉयल एनफिल्डची सत्ता आहे. जपानी ऑटोमेकर यामाहा देखील मिडलवेट सेगमेंटमध्ये प्रवेश करू इच्छित आहे. कंपनीकडे सध्या भारतात सर्वाधिक शक्ती असलेल्या यामाहा बाईक्स आहेत, 250cc FZ 25 आणि FZS 25. पण कंपनी लवकरच अशी बाईक लाँच करू शकते, जी काही वर्षांपूर्वी भारतात खूप लोकप्रिय झाली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतासह अनेक जागतिक बाजारपेठांमध्ये रेट्रो स्टाईल बाइक्सची मागणी वाढत आहे. भारतात अनेक कंपन्या जुन्या लोकप्रिय बाईक्स नवीन अवतारात आणत आहेत. यामाहाही असेच काही करू शकते. कंपनीने अलीकडे जपानमध्ये RZ350 आणि RZ250 साठी ट्रेडमार्क दाखल केला आहे. भारतातील रेट्रो बाइक्सची क्रेझ लक्षात घेता, यामाहा RZ350 आणि RZ250 भारतातही सादर करू शकते. RD350 भारतात ८० आणि ९० च्या दशकात विकली गेली. क्लासिक डिझाइन आणि दमदार कामगिरीसाठी ही बाइक खूप लोकप्रिय होती. तरीही अनेक ग्राहकांकडे RD350 चालू स्थितीत आहे.

(हे ही वाचा : Fortuner ही विसरुन जाल, देशात बोल्ड लुकसह नव्या अवतारात दाखल झाल्या दोन ७ सीटर SUV कार, किंमत…)

नवीन बाईकमध्ये काय खास असेल?

ही बाइक आधुनिक क्लासिक म्हणून पुन्हा लाँच केली जाण्याची शक्यता आहे. रॉयल एनफिल्ड Royal Enfield 350cc, Honda H’ness CB350, Jawa/Yezdi आणि आगामी Bajaj-Triumph आणि Hero-Harley बाईक यांच्याशी ती स्पर्धा करेल.

जुन्या Yamaha RD350 मध्ये ३४७ cc एअर-कूल्ड इंजिन होते. या इंजिनने ३९ bhp ची कमाल पॉवर जनरेट केली आणि ती ६-स्पीड गिअरबॉक्सशी जोडली गेली. नवीन अवतारमध्ये याला फोर-स्ट्रोक इंजिन मिळण्याची शक्यता आहे. बाईकमध्ये DRL, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, ड्युअल-चॅनल एबीएस, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम आणि असिस्ट आणि स्लिपर क्लचसह एलईडी हेडलॅम्प मिळू शकतो.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Japanese vehicle manufacturer yamaha will rd350 be re launched the company currently has fz and fzs coming with 250 cc engine pdb