प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी जावाने नुकतीच आपली दुचाकी बाजारात लाँच केली आहे. या दुचाकीचे नाव ‘जावा 42 बॉबर’ असे असून ही दुचाकी विविध नवीन फीचर्ससह बाजारात आणण्यात आलेली आहे. या दुचाकीला एकूण तीन रंगामध्ये ही बाजारात सादर करण्यात आले आहे. एक्सप्रेस ड्राईव्हशी बोलताना, कंपनीचे सीईओ आशिष सिंग जोशी, यांनी या दुचाकीच्या खास फिचर्सबद्दल माहिती दिली. तसेच डिसेंबर अखेरीस उत्पादन वाढवण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले. चला तर मग जाणून घेऊया या दुचाकीच्या खास फिचर्स व किंमतीबद्दल.
फिचर्स
या नवीन बाईक मध्ये रायडिंगसाठी ABS कॅलिब्रेशन सुधारण्यात आले आहे. तसेच या बाईक मध्ये LED लाइटिंगसह LCD डिस्प्ले आहे. त्याचबरोबर बाईकच्या मागील बाजूस एक लहान लगेज रॅक देण्यात आलेले आहे.
आणखी वाचा : MG ने लाँच केली बाजारपेठेत सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार;जाणून घ्या फीचर्स…
इंजिन
या दुचाकीला जावा ४२ दुचाकी प्रमाणेच डिझाईन करण्यात आलेले असून, ही दुचाकी नवीन रेट्रो रोडस्टर स्टाईलमध्ये आहे. या जावाच्या नवीन दुचाकीमध्ये ३३४ सीसी सिंगल-सिलेंडर, लिक्विड कुल्ड इंजनसह सुसज्ज आहे. जे ३०.६४hp ची मॅक्झिमम पावर आणि ३२.६४ न्यूटन मीटर maximum टॉर्क निर्माण करते. या इंजिन सोबतच या दुचाकीमध्ये ६-स्पीड गिअर बॉक्स उपलब्ध आहे.
किंमत
या दुचाकीच्या रंगानुसार किमतीमध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे. मिस्टिक कॉपर रंगाच्या दुचाकीची एक्स-शोरूम किंमत २.०६ लाख रुपये आहे, तर मुन स्टोन व्हाईट रंगाच्या दुचाकीची एक्स-शोरूम किंमत २.०७ लाख रुपये आहे. त्याचबरोबर जास्पर रेड रंगाच्या दुचाकीची एक्स-शोरूम किंमत २.०९ लाख रुपये एवढी आहे.