Jawa Yezdi Motorcycles ने तिचे दोन सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल Jawa 42 आणि Yezdi Roadster नवीन ड्युअल टोन प्रकारांमध्ये लाँच केले आहे. सर्व सुधारणांसह, दोन्ही प्रकार चार नवीन रंग पर्यायांमध्ये सादर केले गेले आहेत. पाहा या दुचाकीमध्ये काय आहे खास…?
New Jawa 42, Yezdi Roadster नवीन बाईक ‘या’ वैशिष्ट्यांनी सुसज्ज
नवीन जावा 42 ड्युअल टोन प्रकारात क्लिअर लेन्स इंडिकेटर, शॉर्ट-हँग फेंडर्स आणि अपडेटेड डिंपल्ड फ्युएल टँक यांसारख्या वैशिष्ट्यांसह येतो. डायमंड-कट अलॉय व्हील्स याला चांगला लुक देतात. याशिवाय, जावा 42 ड्युअल टोन प्रकाराचा लूक अधिक आकर्षक बनवण्यासाठी, इंजिन आणि एक्झॉस्ट घटकांना रेवेन टेक्सचर फिनिश देण्यात आले आहे. ज्यामध्ये कॉस्मिक रॉक, इन्फिनिटी ब्लॅक, स्टारशिप ब्लू आणि सेलेस्टियल कॉपर यांचा समावेश आहे. नवीन बाईकची सीटही नव्याने डिझाइन करण्यात आली आहे. या नवीन प्रकारात पुन्हा डिझाइन केलेली बॅश प्लेट, नवीन हँडलबार-माउंटेड मिरर आणि हँडलबार ग्रिप आहेत.
(हे ही वाचा : Seltos-Nexon विसरुन मारुतीच्या ‘या’ कारवर संपूर्ण देश फिदा, २७ हजार लोकं रांगेत, वेटिंग पीरियड सात महिन्यांवर )
नवीन जावा 42 प्रमाणे, Yezdi Roadster ला देखील काही डायमंड-कट अलॉय व्हील्स आणि इंजिन आणि एक्झॉस्टवर रेवेन टेक्सचर फिनिश डिझाइन वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहेत. यात नवीन हँडलबार ग्रिप आणि हँडलबार-माउंटेड मिरर देखील आहेत. याशिवाय, नवीन Yezdi Roadster मध्ये वक्र मार्ग आणि एक्झॉस्ट नोटसह पुन्हा डिझाइन केलेले एक्झॉस्ट दिसते. हे नवीन मॉडेल ४ नवीन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
New Jawa 42 Dual Tone आणि Yezdi Roadster इंजिन
Jawa 24 मध्ये सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित २९४.७२ cc इंजिन आहे. हे इंजिन ६-स्पीड ट्रान्समिशनसह २७ bhp पॉवर आणि २६.८४ Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. नवीन Yezdi Roadster मध्ये पॉवर आणि टॉर्क निर्मितीसाठी ३३४cc सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित इंजिन आहे. हे इंजिन ६-स्पीड गिअरबॉक्ससह २९bhp पॉवर आणि २८.९५Nm पीक टॉर्क जनरेट करते. यामध्ये असिस्ट आणि स्लिपर क्लच देखील जोडण्यात आले आहेत. दोन्ही बाईकमध्ये ड्युअल-चॅनल एबीएससह डिस्क ब्रेक आहेत. सस्पेन्शन ड्युटीसाठी, टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि ड्युअल शॉक शोषक मागील बाजूस उपलब्ध आहेत.
New Jawa 42 Dual Tone आणि Yezdi Roadster किंमत
नवीन जावा 42 ड्युअल टोनची किंमत १.९८ लाख रुपयांपासून सुरू होते तर नवीन Yezdi Roadsterची किंमत २.०९ लाख रुपयांपासून सुरू होते.