Jeep Discount Offers: २०२३ हे वर्ष संपत असताना ऑटो मार्केटमध्ये कारवर शानदार डिस्काउंट ऑफर्सचा सुरू झाल्या आहेत. अनेक कार कंपन्या त्यांच्या मॉडेल्सवर विविध सूट देत आहेत. ऑफ रोड एसयूव्हीसाठी प्रसिद्ध, जीप आपल्या एका मॉडेलवर ग्राहकांना ११.८५ लाख रुपयांपर्यंतचे डिस्काउंट देत आहे. वर्ष संपण्यापूर्वी सध्याचा स्टॉक संपवणं आणि विक्रीला चालना देणं हा यामागचा उद्देश आहे. चला जाणून घेऊया कोणत्या कारवर किती सूट दिली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या ग्राहकांना जीप चेरोकीवर ११.८५ लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतात. याशिवाय डिसेंबर २०२३ मध्ये जीप कंपास आणि मेरिडियनवरही ऑफर उपलब्ध आहेत. जीप कंपास ही कंपनीची भारतातील एंट्री-लेव्हल ऑफर आहे, ज्याच्या एक्स-शोरूम किमती २०.४९ लाख रुपयांपासून सुरू होतात. जीप कंपासवर डिसेंबर २०२३ मध्ये एकूण १.५ लाख रुपयांच्या ऑफर उपलब्ध आहेत, ज्या या महिन्याच्या शेवटपर्यंत वैध आहेत. याशिवाय, मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही डीलर्स अतिरिक्त ऑफर म्हणून २५,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि १५,००० रुपयांचा कॉर्पोरेट लाभ देखील देत आहेत.

(हे ही वाचा : २८ किमी मायलेज देणाऱ्या कारला ग्राहकांची भरपूर डिमांड; वेटिंग पीरियड पोहोचला वर्षभरापर्यंत, किंमत… )

जीप मेरिडियन

जीप लाइनअपमधील हे एक नवीन वाहन आहे. २०२२ मध्ये मेरिडियन लाँच करण्यात आले. डिसेंबर २०२३ मध्ये या ७-सीटर कारवर ४ लाख रुपयांची रोख सवलत दिली जात आहे, तर निवडक डीलरशिप अतिरिक्त २५,००० रुपये एक्सचेंज बोनस आणि ३०,००० रुपये कॉर्पोरेट फायदे देत आहेत.

जीप ग्रँड चेरोकी

जीपची भारतातील प्रमुख एसयूव्ही ग्रँड चेरोकी आहे, ज्यामध्ये सर्वात मोठ्या ऑफर्स आहेत. यावर कंपनी ११.८५ लाख रुपयांपर्यंत सूट आणि फायदे देत आहे. जीप ग्रँड चेरोकी २७०bhp २.०-लिटर पेट्रोल इंजिनसह येते, जी ८-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेली आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jeep is offering a host of benefits in december 2023 in the form of cash discounts exchange bonuses pdb