अमेरिकन ऑटोमेकर जीपने आपली मेरिडियन ७ सीटर एसयूव्ही भारतात आणली आहे. नवीन मेरिडियनला तीन-पंक्तीची सीट देण्यात आली आहे, जी तुम्हाला जीप कंपास एसयूव्हीमध्ये देखील पाहायला मिळते. २०२२ मध्ये जीपची ही दुसरी लाँचिंग आहे, याआधी कंपनीने भारतात फेसलिफ्ट कंपास ट्रेलहॉक लाँच केला आहे. नवीन जीप मेरिडियन ७ सीटर एसयूव्ही बद्दल जाणून घेऊया…
मेरिडियन ७ सीटर एसयूव्हीचे इंजिन
जीपने मेरिडियन एसयूव्हीमध्ये वापरलेले इंजिन, कंपनीने ते कंपास एसयूव्हीमध्ये देखील वापरले आहे. कंपनीचा दावा आहे की हे इंजिन मेरिडियन एसयूव्हीला केवळ ११ सेकंदात ० ते १०० किमीचा वेग देते. त्याच वेळी, मेरिडियन एसयूव्ही ६ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि ९ स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह लाँच करण्यात आली आहे. यासह, मेरिडियन एसयूव्हीची प्री-बुकिंग मे २०२२ मध्ये सुरू होऊ शकते.
(हे ही वाचा: टोयोटाची सर्वात स्वस्त कार, न्यू जेनरेशन Toyota Glanza ची प्री-लाँच बुकिंग सुरू!)
स्पेसिफिकेशन्स
मेरिडियन एसयूव्हीमध्ये २.० लिटर चार सिलेंडर डिझेल इंजिन आहे. ही फ्रंट व्हील ड्राइव्ह (SUV FWD) आणि ऑल व्हील ड्राइव्ह (AWD) सह ६-स्पीड मॅन्युअल आणि ९-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध असेल. याशिवाय मेरिडियन एसयूव्हीचा टॉप स्पीड १९८ किमी प्रतितास आहे.
(हे ही वाचा: मुंबईत विरुद्ध दिशेने गाडी चालवल्यास दाखल होणार FIR, दोन दिवसांत ५० हून केसेसची नोंद!)
सुरक्षा फीचर्स
जीप कंपास प्रमाणे, मेरिडियन एसयूव्ही मध्येदेखील भरपूर फीचर्स असतील. कंपनीने या एसयूव्हीमध्ये ६०+ सेफ्टी फीचर्स दिले आहेत. ज्यामध्ये ६ एअर बॅक, ३६० डिग्री पार्किंग कॅमेरा आणि सेन्सर सारख्या फीचर्सचा समावेश आहे.
(हे ही वाचा: टू-व्हीलर इन्शुरन्स क्लेम का नाकारला जातो? जाणून घ्या कारण)
त्याच वेळी, जीपचा दावा आहे की या विभागातील इतर एसयूव्हीपेक्षा मेरिडियन एसयूव्ही अधिक प्रशस्त आहे. त्याच वेळी, मेरिडियन एसयूव्ही टोयोटा फॉर्च्युनर, एमजी ग्लोस्टर आणि स्कोडा कोडियाक सारख्या एसयूव्हीशी स्पर्धा करेल.