अमेरिकन ऑटोमेकर कंपनी जीप भारतासह जागतिक बाजारपेठेत आपली इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच करण्याच्या तयारीत आहे. इलेक्ट्रिक एसयूव्ही जीपच्या सिग्नेचर डिझाईन घटकांसह सादर केली जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, जीप आपली पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही २०२३ च्या दुसऱ्या तिमाहीत लाँच करू शकते. ही एसयूव्ही एसटीएलए आर्किटेक्चरवर विकसित केली जाईल. जाणून घेऊया जीपच्या पहिल्या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये काय खास असू शकते.
स्टेलंटिसचे सीईओ कार्लोस तवारेस म्हणाले की, इलेक्ट्रिक SUV कौटुंबिक वाहन असेल. ही एक ऑफ-रोड जीप असेल. याशिवाय आणखी एक जीप ईव्ही असेल, जी २०२४ मध्ये कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट केली जाईल. तवारेसने आगामी इव्हीचे फोटो देखील शेअर केले आहेत. मात्र, त्यांनी या इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या नावाचा खुलासा केलेला नाही. जीपच्या पहिल्या इलेक्ट्रिक एसयूव्हीची केबिन अॅडवान्स असेल. जीप प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. इतर कोणत्याही इलेक्ट्रिक कार किंवा एसयूव्हीमध्ये अशी वैशिष्ट्ये नसतील. ही प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्ही एका चार्जवर उत्तम क्रूझिंग रेंज देईल अशी अपेक्षा आहे.
जीप इलेक्ट्रिक एसयूव्हीचे डिझाइन सध्याच्या जीप कंपाससारखे आहे. यात एलईडी हेडलॅम्प आणि इंटिग्रेटेड एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स दिले आहेत. यात उभ्या स्लॅट्स आहेत परंतु त्यात स्टँडर्ड मॉडेलप्रमाणे मेश ग्रिल नाही. त्याऐवजी काळ्या पॅनल्सचा वापर करण्यात आला आहे. बंपरमध्ये ब्लॅक मेश ग्रिल आहे, तर स्किड प्लेट दिसते. इलेक्ट्रिक एसयूव्हीला ड्युअल-टोन बॉडी पेंट, स्पोर्टी अलॉय व्हील, जाड ब्लॅक क्लेडिंग मिळते. कॅरेक्टर लाइनमुळे गाडी आणखी आकर्षक दिसते. मागील पॅसेंजर दरवाजा सी-पिलरवर स्थित आहे. याशिवाय, SUV ला स्लोप लुकिंग टेलगेट, रूफ स्पॉयलर, एलईडी टेललाइट्स आणि चंकी ब्लॅक बंपर देण्यात आले आहेत.