Maruti Suzuki Jimny Rhino Edition: मारुती सुझुकीने अलीकडेच जिमनी 5-डोर SUV भारतात सादर केली आहे. लोकांना ही SUV भारतात खूप आवडली आहे आणि ती Mahindra Thar शी टक्कर देईल, असे सांगितले जात आहे. त्याचवेळी, कंपनीने नुकतेच मलेशियाच्या बाजारपेठेत त्याचे स्पेशल एडिशन मॉडेल लाँच केले आहे. मलेशियामध्ये ‘Maruti Suzuki Jimny Rihno Editon’ या नावाने सादर करण्यात आली आहे. एसयूव्ही 3-दरवाज्याच्या जिमनीवर आधारित आहे, म्हणून तिला भारतात मारुती जिमनीची ‘धाकटी बहीण’ म्हटले जात आहे. हे काही नवीन डिझाइन घटक आणि अद्यतनित वैशिष्ट्यांसह सादर केले गेले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशेष बाब म्हणजे, कंपनी जिमनी स्पेशल एडिशन एसयूव्हीचे फक्त ३० युनिट्स विकत आहे. ऑफ-रोडिंगची आवड असलेल्या ग्राहकांना नवीन अवतारात सादर केलेली ही एसयूव्ही आवडेल असा कंपनीचा विश्वास आहे. Jimny Rihnoच्या स्पेशल एडिशनला पर्ल व्हाइट पेंटसह लाल, राखाडी आणि काळ्या रंगाची ट्रीटमेंट देण्यात आली आहे.

(हे ही वाचा: Maruti नं विकल्या सर्वाधिक कार, पण ‘या’ कंपनीच्या ७ सीटर कारसमोर सर्वांनीच मानली हार, किंमत…)

Jimny Rihno मध्ये काय आहे खास

कंपनीने जिमनी राइनो ही पूर्णपणे ऑफ-रोडर एसयूव्ही म्हणून सादर केली आहे. स्टँडर्ड मॉडेलच्या विपरीत, यात नवीन फ्रंट ग्रिल, बंपर आणि साइड बॉडी डिकल्स मिळतात. याशिवाय, त्याचा बाह्य रंग देखील याला खडबडीत आणि कठीण एसयूव्हीचा लूक देत आहे. राइनो एडिशनमध्ये कंपनीने वर्टिकल स्लॉट ग्रिल काढून टाकले आहे. त्याचवेळी, सुझुकीच्या लोगोच्या जागी ‘सुझुकी’ शब्दाचा संपूर्ण बॅजिंग वापरण्यात आला आहे. मागील बाजूस, टेल गेटमध्ये जिमनी राइनोचे बॅजिंग देण्यात आले आहे. यामुळे एसयूव्हीला आणखीनच भारी लुक मिळत आहे. याला मानक म्हणून लाल रंगाचे मडगार्ड देखील मिळतात.

जिमनी राइनोला बेडमध्ये सीट फोल्ड करण्याचे वैशिष्ट्य देखील मिळते, जे मानक मॉडेलमध्ये देखील उपलब्ध आहे. भारतात सादर होण्यापूर्वी कंपनी अनेक देशांमध्ये जिमनी विकत होती. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जिमनी 3 डोअर मॉडेलमध्ये विकली जात आहे, तर भारतात ती 5 डोअर व्हर्जनमध्ये आणली गेली आहे.

इंजिन

जिमनी राइनो एडिशनमध्ये १.५ लीटर K15B पेट्रोल इंजिन देखील वापरले जात आहे. हे इंजिन १०५ PS ची कमाल पॉवर आणि १३४ Nm टॉर्क जनरेट करते. यात ५-स्पीड मॅन्युअल आणि ४-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय आहे. ही SUV ४X४ ड्राइव्ह प्रणालीने सुसज्ज आहे. जिमनी राइनो एडिशन १.७५ लाख RN (मलेशियन चलन) मध्ये लॉन्च केले गेले आहे, जे भारतीय चलनानुसार ३० लाख रुपये आहे.

(हे ही वाचा: Maruti Ertiga नव्हे तर ‘ही’ आहे भारतातली सर्वात स्वस्त Family Car, ७ जणांच्या कुटुंबासाठी परफेक्ट, किंमत…)

भारतात कधी होणार लाँच ?

भारतात जिमनी राइनो एडिशन लाँच करण्याबाबत माहिती समोर आलेली नाही. पण भविष्यात ते भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. राइनो एडिशन हा कलेक्टरचा प्रकार असेल आणि फक्त ३० युनिट्स बनवल्या जातील. यासोबतच कंपनी आगामी काळात 5-डोर जिमनीची स्पेशल एडिशनही लॉन्च करू शकते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jimny rhino edition a model thats exclusively available in the malaysian market and limited to just 30 units pdb
First published on: 27-06-2023 at 12:44 IST