John Abraham Buys Mahindra Thar Roxx : बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहम हा एक चांगला स्टार असण्याबरोबरच मोटरसायकल चालवण्याचाही शौकीन आहे. त्याने अनेकदा मोटरसायकलींवरील त्याचे प्रेम कबूल केले आहे. पण, आजवर त्याने क्वचितच कारबद्दल प्रेम व्यक्त केले आहे. ‘द डिप्लोमॅट’ अभिनेत्याच्या मनात चार चाकांवर चालणाऱ्या मशीन्सबद्दलही एक सॉफ्ट कॉर्नर आहे. तर हीच मनातली जागा कायम ठेवत अब्राहमने त्याच्या गॅरेजमध्ये नवीन महिंद्रा थार रॉक्स (Mahindra Thar Roxx) जोडली आहे.

अलीकडच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये अभिनेत्याने मुंबईतील महिंद्रा शोरूममधून त्याची नवीन कार घेतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या अभिनेत्याला त्याच्या थार रॉक्सच्या डिलिव्हरीसाठी सात महिने वाट पहावी लागली, असेसुद्धा सांगण्यात येत आहे. पण, नेमके यामागचे कारण काय चला जाणून घेऊ…

जॉन अब्राहमची महिंद्रा थार रॉक्स…

अब्राहमने खरेदी केलेली थार रॉक्स काळ्या रंगाची आहे. विशेषतः अभिनेत्यासाठी कस्टमाइज केलेली ही थार बेस्पोक एलिमेंट्स (bespoke elements) आहे. थार रॉक्स युनिटमध्ये पुढील व मागील क्वार्टर ग्लास पॅनेल आणि फ्रंट सीट हेडरेस्टवर अभिनेत्याची आद्याक्षरे आहेत. त्याशिवाय डॅशबोर्डच्या डाव्या बाजूला एम्बॉस केलेल्या खास चांदीच्या रंगाच्या डॅशबोर्डवर ‘मेड फॉर जॉन अब्राहम’ असा उल्लेखसुद्धा करण्यात आला आहे. एकंदरीत या थारला एक वेगळाच स्पर्श देण्यात आला आहे.

महिंद्रा थार रॉक्सचे नवीन फीचर्स…

जॉन अब्राहमची थार रॉक्स ही नवीन फीचर्सचा संच असणारी पहिली गाडी आहे. सुरुवातीला ५ दरवाजांच्या थारच्या हँडलबारमध्ये कीलेस एंट्री आणि एक्झिटसाठी रिक्वेस्ट सेन्सर्स आहेत. ऑफ-रोडिंग एसयूव्हीमध्ये आता एरो वायपर आहेत, जे चालवताना घर्षणाचा आवाज कमी येतो. त्याशिवाय‌केबिनच्या आत, ड्रायव्हर आणि सह-ड्रायव्हर दोघांसाठीही फ्रंट आर्मरेस्ट आता पूर्णपणे ॲडजस्टेबल आहे. त्याशिवाय महिंद्राने आता लाँचनंतर सादर केलेल्या मोचा ब्राउन इंटेरियर स्कीमसह थार रॉक्सची डिलिव्हरी सुरू केली आहे.

पॉवरट्रेन…

महिंद्रा थार रॉक्सला २.० लिटर एमस्टॅलियन टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन किंवा २.२ लिटर एमहॉक डिझेल मिल इंजिन दिले जाते. दोन्ही इंजिन पर्याय ६ स्पीड मॅन्युअल किंवा ६ स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिकसह मिळू शकतात. पण, ही ४×४ ड्राइव्ह गाडी फक्त डिझेल मोटरसहच मिळू शकते. अब्राहमने खरेदी केलेली थार रॉक्स ही टॉप-स्पेक AX7 L आहे, जी डिझेल इंजिनावर चालते आणि 4WD पर्याय देते. या व्हेरिएंटची मॅन्युअल किंमत २१.५९ लाख रुपये आणि ऑटोमॅटिक व्हेरिएंटची किंमत २३.०९ लाख (दोन्ही एक्स-शोरूम किमती) रुपये आहे.

Story img Loader