John Abraham’s Suzuki Hayabusa Bike: बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचं बाईक्स प्रेम सर्वांनाच माहित आहे. नुकताच जॉननं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला ज्यात त्यानं आपली नवीन बाईक दाखवली आहे. जॉनने पठाणच्या यशानंतर स्वत:ला आणखी एक महागडी बाईक गिफ्ट म्हणून दिली आहे. जॉनने स्वत: ला ‘सुझुकी हायाबुसा’ (Suzuki Hayabusa ही बाईक गिफ्ट म्हणून दिली आहे. या लाल रंगाच्या बाईकसोबतचा जॉनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जॉनच्या ‘धूम’ चित्रपटानंतर सुझुकी हायाबुसा भारतीय बाजारपेठेत लोकप्रिय नाव बनले आणि या सुपर स्पोर्ट्स बाईकला धूम बाईक असेही संबोधले गेले. जॉन अब्राहमने हायाबुसाचे नवीनतम २०२३ मॉडेल विकत घेतले आहे ज्याचा व्हिडीओ सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे.

Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
ajith kumar team won dubai car race 2
सरावादरम्यान क्रॅश झाली होती कार, तरीही जिंकली दुबईतील स्पर्धा; ‘या’ दाक्षिणात्य सुपरस्टारवर कौतुकाचा होतोय वर्षाव
hero splendor plus price hike
देशात सर्वाधिक विक्री होणारी ‘ही’ बाईक आता महाग; जाणून घ्या नवी किंमत
New Car Launch Tata launches Tiago and Tigor in 2025
५ लाखांत टाटाने लाँच केली नवी कार! अपडेटेड Tiago आणि Tigor चे फीचर्स एकदा बघाच; थेट Marutiला देत आहे टक्कर
Mercedes Benz crosses 2 lakh car sales print eco news
‘मर्सिडीज बेंझ’कडून दोन लाख मोटारींची विक्री; ‘मर्सिडीज बेंझ’कडून दोन लाख मोटारींच्या विक्रीचा टप्पा सर
rupali bhosale buys new mercedes car
मर्सिडीज खरेदी करुन रुपाली भोसलेने नेटकऱ्याची केली बोलती बंद! गाडीवरून ट्रोल करणाऱ्याला ७ आठवड्यांपूर्वीच दिलेलं उत्तर
Royal Enfield Himalayan 750 Launch Soon In India, Check Price & Specification Details
रॉयल एनफिल्डचा मोठा धमाका! पहिली 750 cc इंजिन बाईक लवकरच इंडियन मार्केटमध्ये करणार एन्ट्री; पाहा जबरदस्त फीचर्स

John Abraham 2023 Suzuki Hayabusa  इंजिन

Suzuki Hayabusa मध्ये, १३४० सीसी इनलाइन चार सिलेंडर इंजिन उपलब्ध आहे, जे लिक्विड कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित इंजिन आहे. हे इंजिन १८७ bhp आणि १५० Nm पीक टॉर्क निर्माण करते. या इंजिनसोबत ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स उपलब्ध आहे.

(हे ही वाचा : १ एप्रिलपूर्वी जबरदस्त सेफ्टी फीचर्स असणारी ‘ही’ लोकप्रिय कार खरेदी केल्यास मिळणार ५० हजारांची सूट)

John Abraham 2023 Suzuki Hayabusa फीचर्स

Suzuki Hayabusa मध्ये सर्व नवीन LED लाइट्स, TFT इन्स्ट्रुमेंट कन्सोल, सर्वसमावेशक इलेक्ट्रॉनिक्स सूट, १० लेव्हल ट्रॅक्शन कंट्रोल, १० लेव्हल व्हीलिंग कंट्रोल, ३ लेव्हल इंजिन ब्रेक कंट्रोल आणि लॉन्च कंट्रोल, १० ड्राइव्ह मोड सिलेक्टर, क्विकशिफ्टर आणि हिल असिस्ट कंट्रोल अशी वैशिष्ट्ये आहेत.

John Abraham 2023 Suzuki Hayabusa किंमत

Suzuki Hayabusa 2023 ची सुरुवातीची किंमत १६.४१ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. या बाईकचे नवीन मॉडेल जुन्या आवृत्तीच्या तुलनेत सुमारे २ लाख रुपयांनी महाग आहे.

Story img Loader