जेएसडब्ल्यू समुहाने नवीन वर्षापासून म्हणजेच १ जानेवारीपासून देशातील आपल्या कर्मचार्‍यांना इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी रु. ३ लाखांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने सोमवारी एका निवेदनात भारतभरातील कर्मचार्‍यांसाठी सुरू केलेल्या ‘जेएसडब्ल्यू इलेक्ट्रिक व्हेहिकल पॉलिसी’ या ग्रीन उपक्रमाची माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतातील कॉर्पोरेट कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी असा उपक्रम राबविण्याची पहिलीच वेळ आहे. इलेक्ट्रिक वाहन धोरण १ जानेवारी २०२२ पासून देशभरातील कर्मचाऱ्यांसाठी लागू होईल. नविन धोरणानुसार चारचाकी किंवा दुचाकी इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम देईल, असं सांगण्यात आलं आहे. या धोरणाचा उद्देश संपूर्ण समूहाला इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब करण्यास प्रवृत्त करणे हा आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लासगो येथील COP26 शिखर परिषदेत जाहीर केले आहे की, भारताला २०७० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठायचे आहे, त्यादृष्टीने JSW समूहाने हे नवीन EV धोरण आणले आहे.”जेएसडब्ल्यू समुहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jsw electric vehicle policy for employee rmt