Mg Windsor Ev Booking : देशातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी MG Motors ने गेल्या महिन्यात ११ सप्टेंबरला आपली नवीन इलेक्ट्रिक कार विंडसर ईव्ही लाँच केली. दरम्यान आता या कारचे बुकिंग उद्यापासून म्हणजे ३ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. तसचे या कारची डिलिव्हरी कधी मिळेल? बुकिंगसाठी किती रक्कम भरावी लागेल हे आपण या बातमीमधून जाणून घेणार आहोत.

MG विंडसरसाठी अधिकृतपणे बुकिंग सुरू केले आहे. ग्राहक जवळच्या MG डीलरशिपला भेट देऊन किंवा MG Motor India वेबसाइटवरून बुकिंग करू शकतात. बुकिंग प्रक्रियेसाठी ११,००० रुपये भरावे लागतील. यासाठी ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजल्यापासून बुकिंग सुरू होईल.

MG Windsor तुम्हाला डिलिव्हरी कधी मिळेल?

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ३ ऑक्टोबरपासून बुकिंग सुरू केल्यानंतर, MG Windsor EV ची डिलिव्हरी १२ ऑक्टोबरपासून म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी सुरू होईल.

MG Windsor फीचर्स?

MG Windsor EV मध्ये LED प्रोजेक्टर हेडलॅम्प, LED DRLs, १७ आणि १८-इंच टायर, फ्लश डोअर हँडल, ग्लास अँटेना, क्रोम फिनिश विंडो बेल्टलाइन, गोल्डन टच हायलाइट्ससह नाईट ब्लॅक इंटीरियर्स, लेदर पॅकसह डॅशबोर्ड, ड्रायव्हर आर्मरेस्ट, डोअर ट्रिम, स्टीयरिंग अशी फीचर्स आहेत. ॲम्बियंट लाइट्स, मागील एसी व्हेंट्स, पीएम २.५ फिल्टर, १०.१-इंच टच डिस्प्ले, ७- आणि ८.८-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर्स, १५.६-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, यूएसबी चार्जर पोर्ट, वायरलेस अँड्रॉइड ऑटो, ऍपल कार प्ले, ६-स्पीकर आणि ९ -स्पीकर इन्फिनिटी ऑडिओ सिस्टम पॅनोरॅमिक सनरूफचा पर्याय, एरो लाउंज सीट्स, व्हेंटिलेटेड सीट्स, ६ वी पॉवर ॲडजस्टेबल ड्रायव्हिंग सीट, स्मार्ट एंट्री सिस्टम, स्मार्ट स्टार्ट सिस्टम, क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक टेंपरेचर कंट्रोल, वायरलेस स्मार्टफोन चार्जर यासारखी फीचर्स उपलब्ध आहेत.

हेही वाचा >> BMW CE 02 इलेक्ट्रिक स्कूटर ऑक्टोबरमध्ये होणार लाँच; जाणून घ्या किंमत आणि फिसर्च

किंमत

MG Windsor EV एक्साइट, एक्सक्लुझिव्ह आणि एसेन्स व्हेरिएंटच्या निवडीसह खरेदी केली जाऊ शकते. कंपनीने हे BaaS सह लाँच केले आहे, ज्यामध्ये बॅटरीची किंमत वाहनाच्या किंमतीमध्ये समाविष्ट केलेली नाही. हे बॅटरीशिवाय ९.९९ लाख रुपयांना खरेदी केले जाऊ शकते, तर बॅटरीसह त्याची एक्स-शोरूम किंमत १३.५० लाख रुपयांपासून सुरू होते.