Jump Trade Unveils Nft Drop For Its Metaverse Game Called Raddx: जम्प.ट्रेड (Jump.trade) या ३६०° डिजिटल कलेक्टिबल एनेबलमेंट कंपनी गार्डियनलिंकच्या प्रमुख बाजारस्थळ व व्यासपीठाने त्यांचा पहिला एनएफटी रेसिंग गेम रॅडडीएक्स रेसिंग मेटाव्हर्ससाठी एनएफटी ड्रॉप्स सादर केले आहेत. एनएफटी बाजारपेठेत उत्साहपूर्ण वाढीचा अनुभव घेत असल्याच्या काळादरम्यान हा गेम लाँच करण्यात आला आहे, जेथे विशेषत: भारत ब्लॉकचेन/एनएफटी गेम्ससाठी लक्षवेधक एपिकसेंटर म्हणून उदयास आला आहे.
भारतातील गेमिंग बाजारपेठ २०२५ पर्यंत ३.९ बिलियन डॉलर्स असण्याची अपेक्षा आहे आणि भारताने एनएफटी गेम्सच्या अवलंबतेमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे, जेथे प्रबळ आकडेवारीमधून निदर्शनास येते की ४०० दशलक्ष भारतीय गेमर्सपैकी ३४ टक्के गेमर्सना एनएफटी गेम्सच्या संकल्पनेची ओळख करून देण्यात आली आहे. ११ टक्क्यांहून अधिक भारतीय गेमर्स भविष्यात एनएफटी गेम्सचा प्रयत्न करण्यास उत्सुक आहेत.
आगामी रॅडडीएक्समध्ये उच्च-स्तरीय रेसेस, कॉप चेसेस व टूर्नामेंट्स यांसारख्या घटकांचा समावेश होण्याची अपेक्षा आहे. गेम गॅरेजेस्, कस्टमायझेबल कार्स व डिकॅल्स आणि गेमप्लेला वाढवणारे इतर घटक व अलंकार यांसारखे घटक देईल.
(हे ही वाचा : टाटा टियागोचा खेळ संपणार, एका चार्जमध्ये ३२० किमी धावणारी आली नवी इलेक्ट्रिक कार, किंमत…)
‘‘रॅडडीएक्स रेसिंग मेटाव्हर्समधील मेटाव्हर्स जमिन जाहिरातीच्या क्षेत्रातील क्रांती असेल. ही जाहिरात करण्यासाठी सर्वात नवोन्मेष्कारी पद्धत असेल आणि आमचा विश्वास आहे की, ही पद्धत मेटाव्हर्स जाहिरातीला मुख्य प्रवाहात आणण्यामध्ये अग्रस्थानी असेल. आम्हाला अनेक मोठे ब्रॅण्ड्स बाजारपेठ उपस्थिती निर्माण करण्याची अपेक्षा आहे, जेथे जनरेशन झेड ग्राहक मोठ्या प्रमाणात सहभागी असतील,’’ असे गार्डियनलिंकचे सीओओ कामेश्वरन एलांगोवन म्हणाले.
रॅडडीएक्स रेसिंग मेटाव्हर्स एनएफटी ड्रॉप्समध्ये अनेक कलेक्शन्स असतील, ज्यामध्ये सुपर लूट – ब्लाइंड-परचेस बॉक्स, तीन ऑक्शन्स, मेटाव्हर्स लँड एनएफटी ब्लाइंड परचेस लँडबॉक्स आणि विशेष सुपर लूट बॉक्स यांचा समावेश आहे, जे इतर बॉक्सेसच्या खरेदीवर १ डॉलर्ससाठी खरेदी करता येऊ शकतात.
रॅडडीएक्स रेसिंग मेटाव्हर्सचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ते रिअल इस्टेट पर्याय देते. डिजिटल लँडबॉक्समध्ये इमारती व इतर रचनात्मक घटक असतील, जे जाहिराती क्षेत्रांप्रमाणे दुप्पट होऊ शकतात. अनेक ब्रॅण्ड्स मेटाव्हर्समध्ये उपस्थिती निर्माण करू पाहत असलेल्या काळामध्ये ही घोषणा करण्यात आली आहे. यामधून ते जनरेशन झेड वापरकर्त्यांसाठी पसंतीचे डिजिटल हँगआऊट व्यासपीठ बनण्याचे उत्साहवर्धक चिन्ह दिसून येते. रॅडडीएक्स रेसिंग मेटाव्हर्समधील जमिनीच्या प्रत्येक युनिटची किंमत १५९९ डॉलर्स आहे आणि जमिन जाहिराती होस्ट करता येऊ शकतील अशा इमारतींसह अपग्रेड करता येऊ शकते. जाहिरातींचे होस्टिंग रॅडडीएक्स परिसंस्थेमधील मेटाव्हर्स लँड गुंतवणूकदारांसाठी महसूल निर्मिती यंत्रणा म्हणून सेवा देईल.