Compact SUV Sales In June 2023:  कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंट देशात झपाट्याने वाढत आहे. या सेगमेंटमध्ये अनेक नवीन मॉडेल्स पाहायला मिळत आहेत. मारुती ग्रँड विटारा आणि टोयोटा हायराइडर गेल्या वर्षी सादर करण्यात आल्या होत्या, सध्या या दोन्ही कार्सना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अलीकडेच या वर्षी किआने आपल्या सेल्टोसची फेसलिफ्ट आवृत्ती सादर केली आहे. येत्या काही महिन्यांत होंडा आपली एलिव्हेट देखील लाँच करणार आहे. सध्या क्रेटा या सेगमेंटमध्ये किंग ठरली आहे. तथापि, याला मारुती ग्रँड विटाराकडून जोरदार टक्कर मिळत आहे. ज्याची सुरुवातीची किंमत रु. 10.7 लाख आहे. जून महिन्यात, क्रेटा नंतरच्या सेगमेंटमधील ही दुसरी कार ठरली, ज्याने १०,००० पेक्षा जास्त युनिट्सची विक्री केली.

सर्वाधिक विक्री होणारी टॉप-५ कॉम्पॅक्ट एसयूव्ही (जून २०२३)

Hyundai Creta: जून २०२३ मध्ये १४,४४७ युनिट्स विकल्या गेलेल्या ही सर्वात जास्त विक्री होणारी SUV होती. जून २०२२ मध्ये १३,७९० युनिट्सची विक्री झाली, त्या तुलनेत क्रेटाने वार्षिक आधारावर ४.७६ टक्के वाढ नोंदवली आहे.

(हे ही वाचा : ‘या’ स्वस्त ८ सीटर MPV कार्ससमोर ६-७ Seater ला विसरुन जाल, पहिल्या कारची किंमत फक्त… )

Maruti Suzuki Grand Vitara: मारुती ग्रँड विटाराने जून २०२३ मध्ये १०,४८६ युनिट्सची विक्री केली, क्रेटा नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध नसल्यामुळे त्याच्या वार्षिक विक्री वाढीचा कोणताही आकडा नाही. हे सुमारे २८KMPL चे मायलेज देऊ शकते.

Kia Seltos: या कारच्या विक्रीत घट झाली आहे. जून २०२३ मध्ये त्याची विक्री ५७.३४ टक्क्यांनी घसरून ३,७५८ युनिट्सवर आली. ग्राहक त्याच्या फेसलिफ्टची वाट पाहत आहेत, ज्यासाठी बुकिंग सुरू झाले आहे.

यानंतर कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये टोयोटा हायराइडर (२,८२१ युनिट्सची विक्री) आणि स्कोडा कुशाक (२,१३३ युनिट्सची विक्री) चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.

Story img Loader