Electric Scooter Buying Guide: भारतात इलेक्ट्रिक टू व्हीलर्सची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींना कंटाळून लोक आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहे. इलेक्ट्रिक कारच्या तुलनेत दुचाकी चार्ज करणं तुलनेनं सोपं असल्यामुळे ग्राहकांकडून इलेक्ट्रिक दुचाकींना चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच दिवसेंदिवस इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री वाढत आहे. तुम्ही देखील नवीन इलेक्ट्रिक टू-व्हीलर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. जर तुम्‍ही कमी बजेटमध्‍ये एक लांब रेंज वाली इलेक्ट्रिक स्कूटर ‘कोलेगियो’ (Kollegio) तुम्हाला स्वस्तात खरेदी करता येणार आहे.

Kabira Mobility Kollegio बॅटरी आणि मोटर

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ४८V, २४Ah क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक बसवण्यात आला आहे. या बॅटरीसह, कंपनीने २५० W पॉवर आउटपुटसह BLDC इलेक्ट्रिक मोटर जोडली आहे. या बॅटरी पॅकवर कंपनी १ वर्षाची वॉरंटी देते. बॅटरी चार्जिंगबाबत कंपनीचा दावा आहे की, सामान्य चार्जरने चार्ज केल्यावर हा बॅटरी पॅक ४ तासांत पूर्ण चार्ज होतो.

(हे ही वाचा : जबरदस्त स्पीड-शानदार डिझाइनवाली 125cc ची स्पोर्ट्स बाईक फक्त ३० हजार रुपयांमध्ये न्या घरी; बघा EMI किती? )

Kabira Mobility रेंज आणि टॉप स्पीड

Kollegio इलेक्ट्रिक स्कूटरच्या रेंजबद्दल कंपनीचा दावा आहे की, एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक स्कूटर १०० किमीची रेंज देते. या श्रेणीसह, २५ किमी प्रतितास इतका सर्वोच्च वेग उपलब्ध आहे.

Kabira Mobility किंमत

इलेक्ट्रिक व्हेइकल सेगमेंटमध्ये अतिशय वेगाने वाढणारी कंपनी कबीरा मोबिलिटीची Kabira Mobility Kollegio ही इलेक्ट्रिक स्कूटर ४५,९९० रुपयांना उपलब्ध आहे, याची बॅटरी रेंजही १०० किमी पर्यंत आहे.

Story img Loader