Kawasaki Versys 650, Ninja 650 get massive discounts: कावासाकी बाईक घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वर्ष अखेर असल्याने अनेक ऑटोमोबाईल कंपन्या आपल्या वाहनांवर विशेष ऑफर्स देत आहेत. याच धर्तीवर जपानी दुचाकी कंपनीने कावसाकीने निन्जा या त्यांच्या स्पोर्ट्सबाईक श्रेणीतील बाईकवर ही धमाकेदार सवलत दिली आहे. या बाईकवर ४५,००० रुपयांपर्यंतच्या सवलतींसह ऑफर केल्या जातात आणि ऑफर ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत वैध आहे. त्यामुळे या काळात ग्राहकांना वाहन घेण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे जाणून घेऊया या बंपर सवलतीच्या ऑफर्सबद्दल

२०२४ च्या अखेरीस कावासाकी आपल्या काही मॉडेल्सवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे, ज्यात त्याच्या लाइनअपमधील दोन बेस्ट-सेलर कावासाकी व्हर्सिस ६५० आणि निन्जा ६५० यांचा समावेश आहे.

Atul Subhash suicide case
Atul Subhash : भाड्याची खोली घेतली पण…; अतुल सुभाष यांच्या आत्महत्येपूर्वी पत्नीनं नेमकं काय केलं? पोलिसांचा मोठा खुलासा
Daily Horoscope 16 December 2024
१६ डिसेंबर पंचांग: प्रतिपदा तिथी १२ राशींच्या आयुष्यासाठी…
Chhagan Bhujbal
“हो, मी नाराज आहे”, मंत्रिपदापासून वंचित ठेवलेल्या भुजबळांचं वक्तव्य; म्हणाले, “मला फेकल्यामुळे…”
What Sadabhau Khot Said?
Sadabhau Khot : सदाभाऊ खोत यांची खंत; “आम्ही तीन पक्षांचं शेत नांगरून दिलं, आमची वेळ आली तेव्हा बैलांसकट…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला तरी जीव गमवावा लागत असेल तर…”
Omar Abdullah
इंडिया आघाडीत काँग्रेस विरोध उफाळला, ईव्हीएमवरून ओमर अब्दुल्ला म्हणाले, “मग निवडणुकाच लढवू नका”
Triumph Speed ​​T4
Triumph Speed T4: ट्रायम्फची शक्तीशाली बाईक एवढ्या रुपयांनी झाली स्वस्त, स्टॉक संपण्याआधी ऑफरचा घ्या लाभ
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…

Kawasaki Versys 650

Kawasaki Versys 650 वर एक्स-शोरूम किंमतीवर ३०,००० रुपयांची सूट देत आहे. Kawasaki Versys 650 ची किंमत ७.७७ लाख रुपये आहे. Versys 650 ने या वर्षाच्या सुरुवातीला दोन रंगांमध्ये बाईक ऑफर केल्या आहेत, मेटॅलिक मॅट डार्क ग्रे आणि मेटॅलिक फ्लॅट स्पार्क ब्लॅक.

कावासाकी निन्जा 650

कंपनी निन्जा 650 वर ४५,००० रुपयांची सूट देत आहे. ही ऑफर फक्त महिन्याच्या शेवटपर्यंत वैध असेल. Kawasaki Ninja 650 ची एक्स-शोरूम किंमत भारतात Rs ७.१६ लाख रुपये आहे. Kawasaki Ninja 650 मध्ये 649 cc, पॅरेरल-ट्विन इंजिन आहे, जे 67 bhp पॉवर आणि 64 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. या बाईकचे इंजिन सहा-स्पीड गिअरबॉक्सशी कनेक्ट आहे. या बाईकमध्ये एलईडी लाईट्स, टीएफटी स्क्रीन, ट्रॅक्शन कंट्रोल, एबीएस आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी यासारख्या फीचर्सचा सामावेश आहे.

हेही वाचा >> महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स

कावासाकी निन्जा 500

Ninja 300 प्रमाणे, Kawasaki Ninja 500 वर १५,००० रुपयांची सूट दिली जात आहे. Ninja 500 ची भारतात एक्स-शोरूम किंमत ५.२४ लाख रुपये आहे. ही ऑफर महिन्याच्या शेवटपर्यंत वैध आहे.
Kawasaki Ninja 500 मध्ये 451 cc, पॅरलल-ट्विन, लिक्विड-कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन ४४.७ bhp पॉवर आणि ४२.६ Nm टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन सहा-स्पीड गिअरबॉक्ससह कनेक्ट आहे. या बाईकमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह LCD, ड्युअल-चॅनल ABS आणि LED लाईट्स यासारखी फीचर्स आहेत.

Story img Loader