Kawasaki Bikes Discount: कावासाकी बाईक घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वर्ष अखेर असल्याने अनेक ऑटोमोबाईल कंपन्या आपल्या वाहनांवर विशेष ऑफर्स देत आहेत. याच धर्तीवर जपानी दुचाकी कंपनीने कावसाकीने निन्जा या त्यांच्या स्पोर्ट्सबाईक श्रेणीतील बाईकवर ही धमाकेदार सवलत दिली आहे.कावासाकी इंडिया या महिन्यात आपल्या मोटारसायकलींवर बंपर डिस्काउंट देत आहे. कावासाकी इंडियन मार्केटमध्ये Z900 निन्जा 650 निन्जा 300 आणि निन्जा 500 बाईक्स विकते. हे डिस्काउंट फक्त २८ फेब्रुवारीपर्यंत वैध आहे. कावासाकी या मोटारसायकलींवर १५,००० ते ४५,००० रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे.

कावासाकी निन्जा 300

Police seize Rs 6 to 7 crore worth of cash from Rajkamal Laundry in Indira Nagar Tumsar
भंडारा: खळबळजनक! लॉन्ड्रीतून मिळाले ७ कोटी; रक्कम कुणाची?
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Undisciplined drivers fined Rs 18 lakh 90 thousand Traffic Department takes action
बेशिस्त वाहनचालकांना १८ लाख ९० हजार रुपयांचा दंड; वाहतूक विभागाची कारवाई
Petrol And Diesel Price on 3 february 2025
Petrol Diesel Price : सर्वसामान्यांना मिळणार दिलासा! आज महाराष्ट्रात कमी झाले पेट्रोल-डिझेलचे दर
News About Honda
Honda : होंडा भारतात सुरु करणार इलेक्ट्रिक बाइकची फॅक्टरी, काय असणार खासियत?
car
Maruti Suzuki Price Hike: १ फेब्रुवारीपासून मारुती सुझुकीच्या कार महागणार! कोणत्या कारची किंमत किती वाढली आहे?
maharashtra tops in soybean procurement
सोयाबीन खरेदीत महाराष्ट्र अव्वल;जाणून घ्या, राज्यातून खरेदी किती झाली
Many people including businessman were cheated of Rs 2 crore by promising double profits
दुप्पट नफ्याचे आमिष दाखवत व्यापाऱ्यासह अनेकांना दोन कोटीचा गंडा

कावासाकी निन्जा 300 मध्ये १५,००० रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत असून याची मूळ किंमत ३.४३ लाख रुपये आहे. कावासाकी निन्जा 300 मध्ये इंजिन २९६ सीसी, पॅरलल-ट्विन, लिक्विड-कूल्ड इंजिनने सुसज्ज आहे आहे. तर या बाईकचे इंजिन ३८.८८ बीएचपी पॉवर आणि २६.१ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. याचे इंजिन स्लिपर क्लचसह 6-स्पीड ट्रान्समिशनशी कनेक्टेड आहे. तर फिचर कावासाकी निन्जा 300 मध्ये हॅलोजन हेडलॅम्प, एलईडी टेल लॅम्प, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्मार्टफोन कनेक्टेड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सारख्या फीचर्सचा समावेश आहे.

कावासाकी निन्जा 650

कंपनी निन्जा 650 वर ४५,००० रुपयांची सूट देत आहे. ही ऑफर फक्त महिन्याच्या शेवटपर्यंत वैध असेल. Kawasaki Ninja 650 ची एक्स-शोरूम किंमत भारतात Rs ७.१६ लाख रुपये आहे. Kawasaki Ninja 650 मध्ये 649 cc, पॅरेरल-ट्विन इंजिन आहे, जे 67 bhp पॉवर आणि 64 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. या बाईकचे इंजिन सहा-स्पीड गिअरबॉक्सशी कनेक्ट आहे. या बाईकमध्ये एलईडी लाईट्स, टीएफटी स्क्रीन, ट्रॅक्शन कंट्रोल, एबीएस आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी यासारख्या फीचर्सचा सामावेश आहे.

कावासाकी निन्जा 500

Ninja 300 प्रमाणे, Kawasaki Ninja 500 वर १५,००० रुपयांची सूट दिली जात आहे. Ninja 500 ची भारतात एक्स-शोरूम किंमत ५.२४ लाख रुपये आहे. ही ऑफर महिन्याच्या शेवटपर्यंत वैध आहे.
Kawasaki Ninja 500 मध्ये 451 cc, पॅरलल-ट्विन, लिक्विड-कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन ४४.७ bhp पॉवर आणि ४२.६ Nm टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन सहा-स्पीड गिअरबॉक्ससह कनेक्ट आहे. या बाईकमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह LCD, ड्युअल-चॅनल ABS आणि LED लाईट्स यासारखी फीचर्स आहेत.

Story img Loader