कावासाकी इंडियाने देशातील बाईक प्रेमींना मोठी भेट दिली आहे. कंपनीने आपली नवीन बाईक देशातील बाजारपेठेत दाखल केली आहे. कावासाकीने ‘Kawasaki Eliminator 500’ ही बाईक लाँँच केली आहे. या बाईकमध्ये कंपनीने अनेक जबरदस्त फीचर्स दिले आहेत. ही बाईक दिसायलाही स्टायलिश आहे. या बाईकमध्ये कंपनीने काय दिलं आहे खास. आपणही जाणून घेऊया…
कंपनीने या बाईकमध्ये गोल हेडलॅम्प, स्लीक फ्युएल टँक, एक्स्पोज्ड फ्रेम आणि शॉर्ट फेंडर्स यांसारखी फीचर्स दिली आहेत. व्हिज्युअल हायलाइट्सचा देखील समावेश आहे. सीटची उंची ७३५ मिमी आहे. लांब हँडलबार आणि मध्यभागी फूटपेगसह बाईक चालवणं आरामदायक असू शकते. हे स्प्लिट-सीट सेटअपसह येते. शक्तिशाली कावासाकी एलिमिनेटरमध्ये ४५१cc, लिक्विड-कूल्ड, पॅरलल-ट्विन इंजिन आहे, जे ४४bhp आणि ४२.६Nm आउटपुट तयार करते. हे इंजिन स्लिप आणि असिस्ट क्लचद्वारे ६-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. एलिमिनेटर स्टील ट्रेलीस फ्रेमवर आधारित आहे, जे विशेषतः क्रूझर्ससाठी डिझाइन केलेले आहे.
(हे ही वाचा : गेल्या महिन्यात Royal Enfield च्या बाईककडे ग्राहकांनी फिरविली पाठ? ‘इतक्या’ टक्क्यांनी विक्रीत घसरण )
क्रूझरमध्ये १८ इंच फ्रंट आणि १६ इंच मागील अलॉय व्हील आहेत. ब्रेकिंगसाठी, ३१० mm फ्रंट आणि २४० mm रियर डिस्क ब्रेक दिले गेले आहेत, जे ड्युअल चॅनल ABS सह आहेत. एलिमिनेटरचे वजन १७६ किलो (कर्ब) आहे. त्याचे ग्राउंड क्लीयरन्स १५० मिमी आहे. नवीन Kawasaki Eliminator 500 या बाईकच्या पुढील बाजूस १८-इंच अलॉय व्हील्स आणि मागील बाजूस १६-इंच अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. तसेच या बाईकला ड्युअल चॅनल ABS सोबत समोरच्या बाजूला ३१० mm डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस २४० mm डिस्क ब्रेक देण्यात आलेत. एलिमिनेटरला कावासाकीच्या राइडोलॉजी अॅपद्वारे सर्व-एलईडी दिवे, संपूर्ण डिजिटल एलसीडी इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी मिळते.
Kawasaki Eliminator बाईकची किंमत
मिळालेल्या महितीनुसार, Kawasaki Eliminator 500 या बाईकची एक्स शोरूम किंमत ५.६२ लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. डिलिव्हरीही लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. भारतीय बाजारपेठेत ही बाईक थेट रॉयल एनफील्ड शॉटगन ६५० शी स्पर्धा करेल.