प्रसिद्ध जपानी दुचाकी उत्पादक कंपनी Kawasaki आपल्या स्पोर्ट्स बाईकसाठी खूप लोकप्रिय आहे. कावासाकीच्या बाईक जबरदस्त लूक आणि आकर्षक फीचर्ससाठी ओळखल्या जातात. कावासाकी भारतीय बाजारपेठेत आपल्या नवनव्या बाईक सादर करीत असते आणि या बाईक्सना ग्राहकांची चांगली पसंतीही दिसून येते. परंतु आता कंपनीने आपल्या ग्राहकांना धक्का दिला आहे. कंपनीने आपली लोकप्रिय बाईक आता बंद करण्याची घोषणा केली आहे. या बाईकने भारतीय बाजारपेठेवर राज्य केले होते. ही बाईक तिच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी आणि आकर्षक स्पोर्टी लुकसाठी ओळखली जाते. याचे उत्पादन बंद केल्यामुळे त्याचे चाहते खूपच निराश झाले आहेत.
कावासाकीने आपली स्पोर्ट्स बाईक ‘Ninja 400’ भारतीय बाजारपेठेत बंद केली आहे. कंपनीने अलीकडेच देशात Ninja 500 लाँच केले, त्यानंतर काही महिन्यांनंतर कंपनीने Ninja 400 बंद केले. वास्तविक, नवीन Ninja 500 मुख्यत्वे Ninja 400 वर आधारित आहे. हे फक्त Ninja 400 बदलण्यासाठी आणले होते, असे सांगण्यात येत आहे.
Ninja 400 प्रथम भारतात २०२८ मध्ये पूर्णपणे आयात केलेले (CBU) मॉडेल म्हणून ४.६९ लाख रुपये (एक्स-शोरूम) किमतीत लाँच केले गेले. परंतु, BS6 उत्सर्जन मानकांच्या अंमलबजावणीमुळे, त्याची विक्री एप्रिल २०२० मध्ये तात्पुरती थांबवण्यात आली. ही एंट्री-लेव्हल स्पोर्ट्स बाईक २०२२ मध्ये पुन्हा लाँच करण्यात आली होती, परंतु ती अलीकडे कावासाकीच्या इंडिया वेबसाइटवरून काढून टाकण्यात आली आहे.
(हे ही वाचा : हिरोच्या बाईक सोडून आता पहिल्यादांच ‘या’ कंपनीच्या बाईक स्कूटर्सच्या मागे लागले भारतीय, झाली दणक्यात विक्री )
वास्तविक, कावासाकीने या वर्षी फेब्रुवारीमध्ये Ninja 500 लाँच केले आणि Ninja 400 चा स्टॉक संपेपर्यंत दोन्ही बाईक एकत्र विकल्या जात होत्या. गेल्या काही महिन्यांमध्ये, Ninja 400 ४०,००० रुपयांच्या सवलतीसह विकली जात होती, ज्यामुळे त्याची किंमत ४,८४,००० रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत खाली आली.
Ninja 400 ने कावासाकीच्या स्पोर्ट्स बाइक श्रेणीतील Ninja 300 आणि Ninja 650 मधील अंतर कमी केले. Ninja 400 मध्ये ३९९cc समांतर-ट्विन लिक्विड-कूल्ड DOHC ८-वाल्व्ह इंजिन होते, जे १०,००० rpm वर ४४.८ bhp आणि ८००० rpm वर ३७ Nm जनरेट करते. हे युनिट स्लिपर क्लचसह ६-स्पीड ट्रान्समिशनशी जोडलेले होते.
तर, Ninja 500 मध्ये ४५१cc लिक्विड-कूल्ड, पॅरलल-ट्विन इंजिन आहे जे ९,०००rpm वर ४५bhp आणि ४२.६Nm पीक टॉर्क देते. Ninja 400 प्रमाणेच, Ninja 500 बाजारात KTM RC 390, Aprilia RS 457 आणि Yamaha R3 सोबत स्पर्धा करते.