2023 Kawasaki Versys 1000 Bookings Start in India: कावासाकी इंडिया (Kawasaki India) ने अलीकडेच देशात ‘Versys 1000 motorbike’ अपडेट केली आहे. कंपनीने आता 2023 Kawasaki Versys 1000 चे बुकिंग सुरु केले आहे. नवीन कावासाकी मोटरसायकल देशभरातील अधिकृत डीलरशिपद्वारे बुक केली जाऊ शकते. 2023 Kawasaki Versys 1000 ची किंमत १२.१९ लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.
2023 Kawasaki Versys 1000 बाईकची खास वैशिष्ट्ये
बाईकमध्ये १०४३cc लिक्विड-कूल्ड इनलाइन फोर इंजिन आहे, जे ९,००० RPM वर ११८.२ BHP ची पीक पॉवर आणि ७,५०० RPM वर १०२ NM चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. इंजिन सहा-स्पीड ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. यात असिस्ट आणि स्लिपर क्लच सिस्टम देखील मिळते.
(हे ही वाचा : Ola-Hero चा खेळ संपला, दोन बॅटरी असलेली इलेक्ट्रिक स्कूटर आली बाजारात, खरेदीसाठी ग्राहकांच्या रांगा )
2023 Kawasaki Versys 1000 या रंगांमध्ये उपलब्ध असेल
Versys 1000 नवीन ड्युअल-टोन कलर पर्यायामध्ये सादर करण्यात आला आहे, ज्यामध्ये इबोनी ब्लॅकसह मेटॅलिक मॅट ग्राफीन स्टील ग्रे आहे. 2023 Kawasaki Versys 1000 ला अॅडजस्टेबल विंडस्क्रीनसह ड्युअल एलईडी हेडलॅम्प मिळतात. नवीन कावासाकी बाईकमध्ये अॅनालॉग टॅकोमीटरसह डिजिटल एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील आहे.
2023 Kawasaki Versys 1000 १७-इंच चाकांवर चालते. बाईकच्या सस्पेन्शन सिस्टीममध्ये ४३mm अपसाइड-डाउन फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस मोनो-शॉक युनिट आहे. हे रेडियल माउंट फ्रंट ब्रेक कॅलिपर, ट्रॅक्शन कंट्रोल, क्रूझ कंट्रोल आणि एबीएससह अनेक वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. यात बॉश IMU युनिटसह कावासाकी कॉर्नरिंग मॅनेजमेंट फंक्शन देखील मिळते.
(हे ही वाचा : स्वप्न करा पूर्ण! १०.८४ लाखाची सर्वाधिक विकली जाणारी कार आणा ४ लाखात घरी, ‘असा’ घ्या फायदा )
2023 Kawasaki Versys 1000 स्पर्धा
2023 Kawasaki Versys 1000 भारतीय बाजारपेठेत BMW F 900 XR आणि Triumph Tiger 850 Sport शी स्पर्धा करते. जर तुम्हाला ही बाईक घ्यायची असेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या कंपनीच्या शोरूमला जाऊन बुक करू शकता.