2025 Kawasaki Ninja 500 launched In India : प्रसिद्ध जपानी दुचाकी उत्पादक कंपनी कावासाकी (Kawasaki) आपल्या स्पोर्ट्स बाईकसाठी प्रचंड लोकप्रिय आहे. कावासाकीच्या बाईक नेहमीच जबरदस्त लूक आणि आकर्षक फीचर्ससाठी ओळखल्या जातात. त्याचबरोबर कावासाकी भारतीय बाजारपेठेत आपल्या नवनव्या बाईक सादर करीत असते. त्यामुळे या बाईक्सना ग्राहकांची चांगली पसंतीही दिसून येते. तर आता नवीन वर्षात कंपनी त्यांचे नवीन मॉडेल घेऊन आली आहे (2025 Kawasaki Ninja 500).
कावासाकीने भारतात निन्जा ५०० (2025 Kawasaki Ninja 500)चे अपडेटेड इंटरेशन लाँच केले आहे. निन्जा ५०० ची किंमत ५.२९ लाख रुपये (एक्स-शोरूम) असणार आहे. त्यामुळे त्याची किंमत पाच हजार रुपयांनी वाढली आहे. कावासाकीने निन्जा ५०० वर १५ हजार रुपयांची सूट दिल्याच्या काही आठवड्यांनंतर ही वाढ झाली आहे.
२०२५ कावासाकी निन्जा ५०० (2025 Kawasaki Ninja 500) ला न्यू कलर स्कीम, सुधारित बॉडी ग्राफिक्स मिळतात. यांत्रिक आणि कार्यात्मकदृष्ट्या, मध्यम वजनाचा स्पोर्ट्स टूरर आधीच्या बाईकप्रमाणेच असेल. निन्जा ५०० मध्ये कावासाकीची सिग्नेचर व्हिज्युअल हायलाइट्ससह चिसेल्ड फेअरिंग, ट्विन एलईडी हेडलाइट्स, फ्लोटिंग टेल सेक्शन, अपस्वेप्ट एक्झॉस्ट, स्प्लिट सीटव मस्क्युलर इंधन टाकी, बाजूच्या पॅनेलला कावासाकी हिरव्या रंगाचा डॅश, साइड फेअरिंगमध्ये एम्बेड केलेले टर्न इंडिकेटरसुद्धा आहे.
फीचर्स आणि स्पेक्स :
फीचर्सच्या बाबतीत सांगायचे झाल्यास कावासाकीला एक निगेटिव्हक इन्स्ट्रुमेंट पॅनेल मिळते, जे कॉल, टेक्स्ट, अलर्ट व रायडिंग लॉगसाठी ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी पॅक करते. बाईक ट्रॅक्शन कंट्रोल, रायडिंग मोड; तर फेअर्ड मोटरसायकलमध्ये स्टील ट्रेलीस फ्रेमवर आधारित आहे, जी १२० मिमी व्हील ट्रॅव्हलसह ४१ मिमी टेलिस्कोपिक फोर्क आहे आणि मागच्या साईडला प्रीलोड अॅडजस्टमेंटसह १३० मिमी प्रवासासह गॅस-चार्ज केलेले मोनोशॉक सस्पेन्शन आहे. हा सस्पेन्शन सेटअप बाईकला अधिक कम्फर्ट बनवतो.
कावासाकीमध्ये ३१० मिमीसमोर डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस २२० मिमी डिस्क ब्रेक आहे, जे ड्युअल-चॅनल एबीएससह आहेत. बाईकमध्ये ११० सेक्शन फ्रंट आणि १५० सेक्शन रिअर टायरसह १७ इंच अलॉय व्हील्सवर चालवता येईल . निन्जा ५०० ला पॉवरिंग ४५१ cc लिक्विड-कूल्ड, पॅरलल-ट्विन इंजिन आहे, जे ४४ bhp आणि ४२.६ Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे युनिट स्लिप आणि असिस्ट क्लचद्वारे सह-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे.