कावासकीने भारतीय बाजारात अपडेटेड MY22 Ninja 1000SX मोटारसायकल लॉन्च केली आहे. नवीन 2022 कावासकी Ninja 1000SX ची किंमत भारतात ११.४० लाख रुपये इतकी एक्स-शोरूमपासून सुरू होते. तसं पाहिलं तर या किमतीच्या टप्प्यात Ninja 1000SX परवडणारी लिटर-क्लास मोटरसायकल आहे. या लिटर-क्लास स्पोर्ट्स मॉडेलमध्ये काही बदल केले आहेत. नवीन 2022 Kawasaki Ninja 1000SX ची बुकिंग आता भारतात सुरु झाली असून डिलिव्हरी पुढील महिन्याच्या सुरुवातीला सुरू होईल.
नवी Kawasaki Ninja 1000SX दोन नवीन कलर स्कीममध्ये आहे. इमराल्ड ब्लेझड ग्रीन आणि मेटालिक मॅट ग्राफेनेस्टेल ग्रे या दोन रंगात आहे. यात बॉडी पॅनलवर काही नवीन ग्राफिक्स देण्यात आले आहेत. मोटरसायकलचा एकूण स्पोर्टी लूक आकर्षक वाटतो. या कॉस्मेटिक अपडेट्सशिवाय, ही लिटर-क्लास स्पोर्ट्स टूरर पूर्वीसारखीच आहे. वैशिष्ट्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर, याला ४.३ -इंचाचा टीएफटी कलर डिस्प्ले इन्स्ट्रुमेंट क्लस्टर म्हणून दिला आहे. जो कावासाकीच्या राइडोलॉजी अॅप, ऑल-एलईडी लाइटिंग इत्यादीद्वारे स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो. नवीन 2022 Kawasaki Ninja 1000SX ही BS6 सारखी १०४३ सीसी, लिक्विड-कूल्ड, चार-स्ट्रोक, इनलाइन चार-सिलेंडर इंजिनद्वारे धावते. इंजिन १०,००० आरपीएलवर १४० अश्वशक्ती कमाल पॉवर आणि ८,०० आरपीएमवर १११ एनएम पीक टॉर्क देते. इंजिनला ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. यात क्विकशिफ्टर, क्रूझ कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, दोन पॉवर मोड (फुल, लो), चार राइडिंग मोड (स्पोर्ट, रोड, रेन, रायडर) आणि स्विच करण्यायोग्य तीन-स्तरीय ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम देखील मिळते.
BMW येत्या सहा महिन्यात लॉन्च करणार ३ इलेक्ट्रिक गाड्या; जाणून घ्या
हार्डवेअरबद्दल बोलायचे झाले तर, अपडेटेड Kawasaki Ninja 1000SX ला १२० एमएम प्रवासासह ४१ एमएम यूएसडी फोर्क्स आणि मागील बाजूस १४४ एमएम व्हील ट्रॅव्हलसह गॅस चार्ज केलेला मोनो-शॉक ऑबसॉर्बर आहे. गाडी थांबवण्यासाठी याला पुढील बाजूस ड्युअल ३०० मिमी डिस्क आणि मागील बाजूस एबीएस आणि कॉर्नरिंग मॅनेजमेंट फंक्शनसह सिंगल २५० मिमी डिस्क मिळते. मोटरसायकल १२०/७० सेक्शन १७-इंच टायरवर (समोर) चालते आणि मागच्या बाजूस १९०/५० सेक्शन १७-इंच टायर मिळतो.