Kawasaki Made-In-India Bike: कावासाकीने आपल्या लोकप्रिय स्पोर्टस बाईक Kawasaki Ninja 300 चे अपडेट व्हेरिएंट भारतात लाँच केले आहे. कावासाकी निन्जा 300 2024 एडिशन या नावाने ही बाईक सादर करण्यात आली आहे. नवीन Kawasaki Ninja 300 च्या डिझाइनमध्ये फारसा बदल झालेला नाही, पण ही बाईक नवीन कलर पॅटर्न आणि नवीन बॉडी ग्राफिक्ससह सादर करण्यात आली आहे, ज्यामुळे ही बाईक आधीच्या तुलनेत काही प्रमाणात वेगळी दिसते.
निन्जा ३०० एडिशन तीन रंगांच्या पर्यायांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. वरील व्हिज्युअल अपडेट्समध्ये कँडी लाइम ग्रीन आणि मेटॅलिक मूनडस्ट ग्रे या नवीन रंगसंगतींचा समावेश केला आहे. याशिवाय, लाइम ग्रीन पेंट स्कीम नवीन ग्राफिक्ससह येते. ड्युअल हेडलॅम्प, क्लिप-ऑन हँडलबार आणि स्टेप्ड सीट यांसारख्या हायलाइट्ससह बाईकचे डिझाइन तयार केले आहे. शिवाय, निन्जा ३०० हे कावासाकीचे एकमेव मॉडेल आहे, जे भारतात तयार केले जाते.
कावासाकी निन्जा ३०० : वैशिष्ट्ये
Kawasaki Ninja 300 मध्ये कोणतेही यांत्रिक बदल करण्यात आलेले नाहीत. या बाईकमध्ये करण्यात आलेला मोठा बदल म्हणजे या बाईकमध्ये ABS चे वैशिष्ट्य जोडण्यात आले आहे. याशिवाय ही कावासाकी बाईक नवीन कलर व्हेरियंटसह आणण्यात आली आहे. कावासाकी निन्जा ३०० मध्ये दोन नवीन कलर व्हेरियंट कँडी लाइम ग्रीन आणि मेटॅलिक मूनडस्ट ग्रे समाविष्ट करण्यात आले आहेत. ही कावासाकी बाईक ड्युअल थ्रॉटल व्हॉल्व्हने सुसज्ज आहे, जी इंजिनची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करते. या बाइकमध्ये पेटल डिस्क ब्रेकचा वापर करण्यात आला आहे. तसेच, बाईक जास्त गरम होऊ नये यासाठी उष्णता व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. तसेच ही बाईक स्पोर्टी इन्स्ट्रुमेंट पॅनल डिझाइनसह आणखी स्टायलिश दिसते. बाईक सहज चालवण्यासाठी, मोटारसायकलला हँडल तसे बनवण्यात आले आहे.
हेही वाचा >> बाजारात ७.४६ लाखाच्या ‘या’ ५ सीटर SUV ला तुफान मागणी, १४ महिन्यांत १.५ लाखाहून अधिक कारची विक्री, मायलेज…
कावासाकी निन्जा ३०० ची किंमत
भारतात या नवीन बाईकची एक्स-शोरूम किंमत ३.४३ लाख रुपये आहे. दशकापूर्वी जेव्हा कावासाकी निन्जा ३०० बाजारात आली तेव्हा त्याच्या CBU मॉडेलची किंमत ३.५० लाख रुपये होती. आता भारतात बनवलेल्या या बाईकची किंमत ३.४३ लाख रुपये आहे. आता ही बाईक तीन कलर व्हेरियंटसह बाजारात उपलब्ध आहे.