भारताच्या प्रीमियम बाइक सेगमेंटमध्ये आणखी एक नवीन बाइक लाँच करण्यात आली आहे. जपानी दुचाकी उत्पादक कंपनी कावासाकीने लॉन्च केली असून बाइकला Kawasaki Z650 RS 50th Anniversary Edition असे नाव देण्यात आले आहे. कंपनीने या बाइकला रेट्रो लूक दिला आहे. बाइकमध्ये आकर्षक ड्युअल कलर स्कीमसह क्रोमचाही वापर करण्यात आला आहे, त्यामुळ ही बाइक ८० च्या दशकातील प्रीमियम बाईकसारखी दिसते. तसेच बाइकमधील अद्ययावत फिचर्स लक्ष वेधून घेतात.

Kawasaki Z650 RS 50th Anniversary Edition च्या इंजिन आणि पॉवरबद्दल सांगायचे तर, कंपनीने यामध्ये ६४९ सीसी इंजिन दिले आहे. हे इंजिन ६७.३ बीएचपीची कमाल पॉवर आणि ६४ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत कंपनीकडे ६ स्पीड मॅन्युअल स्टँडर्ड गिअरबॉक्स दिले आहेत. बाईकच्या ब्रेकिंग सिस्टममध्ये कंपनीने त्याच्या पुढच्या चाकामध्ये ३०० मिमी डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये २२० मिमी डिस्क ब्रेक दिला आहे. इंजिन किल स्विच, फ्युएल वॉर्निंग इंडिकेटर, लो ऑइल इंडिकेटर, फ्युएल गेज, गियर इंडिकेटर, बॅटरी इंडिकेटर आणि पास लाईट यासारखी नवीन वैशिष्ट्ये दिली आहेत.

Kawasaki Z650 RS 50th Anniversary Editionची किंमत ६.७९ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. भारतात या बाइकचा एक प्रकार आधीच उपलब्ध आहे. नवी बाइक कंपनीने विशेष वर्धापन दिन एडिशन म्हणून सादर केली आहे. या बाईकचे प्री-बुकिंग सुरू केले आहे, जर तुम्हाला ही बाईक खरेदी करायची असेल, तर तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा कावासाकी डीलरशिपवर जाऊन बुक करू शकता. या बाइकची रॉयल एनफील्ड इंटरसेप्टर 650, रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल जीटी 650, हार्ले डेव्हिडसन स्ट्रीट 750, होंडा सीबीआर 650, सुझुकी व्ही स्टॉर्म 650 आणि डुकाटी स्क्रॅम्बलर यांसारख्या प्रीमियम क्रूझर बाइकशी स्पर्धा असेल.

Story img Loader