हंगेरियन दुचाकी निर्माता कंपनी कीवेने आपल्या K300 N आणि K300 R या दोन नवीन दुचाकी भारतीय बाजारात सादर केल्या आहेत. Keeway K300 N २.६५ लाख रूपये लाँच करण्यात आले आहे, तर K300 R ची एक्स-शोरूम किंमत २.९९ लाख रूपये लाँच करण्यात आली आहे. कंपनीने नवीन बाइक्सचे बुकिंग सुरू केले आहे, तर डिलिव्हरी या महिन्याच्या अखेरीस सुरू होऊ शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कीवेने दोन्ही मोटारसायकल तीन पेंट स्कीममध्ये ऑफर केल्या आहेत. K300 N मॅट व्हाईट, मॅट रेड आणि मॅट ब्लॅक रंगांमध्ये उपलब्ध आहे, तर K300 R ग्लॉसी व्हाईट, ग्लॉसी रेड आणि ग्लॉसी ब्लॅक रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. इंजिनच्या बाबतीत, या दोन्ही मोटरसायकल २९२.४cc, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड, फोर-स्ट्रोक इंजिनद्वारे समर्थित आहेत. हे इंजिन २५ एनएमच्या पीक टॉर्कसह २७.१ bhp ची कमाल पॉवर जनरेट करते.

(हे ही वाचा : मारुतीची ‘ही’ कार बाजारपेठेत दाखल होण्यापूर्वीच तब्बल ५३ हजार लोकांनी खरेदीसाठी लावल्या रांगा!)

इंजिन ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. हार्डवेअरच्या बाबतीत, Keeway K300N ला सोनेरी यूएसडी फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस मोनो-शॉक शोषक मिळतात. याशिवाय बाईकमध्ये शार्प एलईडी हेडलाइट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, शार्प फ्युएल टँक आणि स्लिम बॅक डिझाइन देण्यात आले आहे.

कीवेच्या स्पोर्टी फुल फेअर बाईक K300R ला एलईडी टेल लाईट आणि एलईडी टर्न इंडिकेटरसह एलईडी हेडलाइट मिळतो. दुचाकीच्या हेडलाइटमध्ये ट्विन इंटिग्रेटेड एलईडी डीआरएल देखील देण्यात आले आहेत. या दुचाकीमध्ये क्लिप-ऑन-हँडल बार उपलब्ध आहे. दुचाकीला समोरून आकर्षक बनवण्यासाठी गोल्डन यूएसडी फ्रंट फोर्क्स देण्यात आले आहेत.

दोन्ही दुचाकीमध्ये समान क्षमतेची इंधन टाकी देण्यात आली आहे. याशिवाय दोन्हीमध्ये डिस्क ब्रेक, एबीएस, अलॉय व्हील्स आणि टायर समान आकाराचे आहेत. कीवेने ने भारतीय बाजारपेठेत आपली चार दुचाकी वाहने लाँच केली आहेत ज्यात दुचाकी आणि स्कूटरचा समावेश आहे. नवीन दुचाकी लाँच केल्यामुळे कंपनीने आता एकूण सहा मॉडेल्ससह बाजारात उपलब्ध केले आहे. भारतात, कंपनी बेनेली इंडियाच्या सहकार्याने आपली सर्व वाहने सादर करत आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Keeway has launched two new motorcycles in india pdb