कियाने भारतात चार लाख गाड्यांची विक्री करत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्याचबरोबर कंपनीने आंध्र प्रदेशातील अनंतपूर कारखान्यातून आतापर्यंत ५ लाख वाहने रवाना केली आहेत. सेल्टोसने सप्टेंबर २०१९ मध्ये शिपिंग सुरू केल्यापासून कंपनीने ९१ पेक्षा जास्त देशांमध्ये १ लाख युनिट्सची निर्यात देखील केली आहे. २०२१ मध्ये २५% पेक्षा जास्त बाजारपेठेसह कंपनी भारतातील आघाडीची वाहन निर्यातदार कंपनी बनली आहे. किआ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ ताए-जिन पार्क सांगितले की, भारतात आमची स्थापना झाल्यापासून आम्ही आमच्या उत्पादनांद्वारे ग्राहकांना उत्तम सेवा देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.किया इंडियाने नुकतेच आपले चौथे उत्पादन कॅरेन्स लाँच केली आहे. या गाडीची किंमत ८.९९ लाख (एक्स-शोरूम) रुपये आहे. मेड-इन-इंडिया जागतिक वाहन धोरणावर काम करत आहे. कॅरेन्ससह आम्हाला आमचा पुढचा टप्पा अतिशय जलद गतीने गाठायचा आहे.

कॅरेन्सची विक्री सुरु झाल्यापासून जवळपास एका महिन्यात कंपनीला आतापर्यंत १९ हजारांहून अधिक बुकिंग मिळाले आहे. हे नवीन मॉडेल तीन इंजिन पर्यायांसह सादर करण्यात आले आहे. यामध्ये १.५-लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल मोटर, १.४-लीटर टर्बो पेट्रोल युनिट आणि १.५-लीटर डिझेल इंजिन यांचा समावेश आहे. कंपनीचा दावा आहे की कॅरेन्स पेट्रोल इंजिनसह १६.५ किमीचा तर डिझेलसह २१.३ किमीचा मायलेज देते.

Hyundai Offers Discount: ह्युंदाई ‘या’ गाड्यांवर देतंय ५० हजार रुपयांपर्यत सूट

किया कॅरेन्स हे ह्युंदाइ Alcazar पेक्षा दिसायला थोडी अधिक कॉम्पॅक्ट आहे. कारण तिची लांबी ४,५४० मीमी, रुंदी १,८०० मीमी आहे आणि १,७०८ मीमी उंच आहे. व्हिलबेस २,७८० मीमीचा आहे.